आपला जिल्हा

नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे – शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे 

 नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे – शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे 
नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे – शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ मार्च २०२६कोपरगाव तालुक्यातील सर्व भागात सोमवारी दुपारी चार वाजता व सायंकाळी सात वाजता झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान केलेले आहे.हाथा तोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. कांदा गहू चारा पिके व फळबागांचा यात समावेश आहे. कृषी विभाग व महसूल विभागाने तातडीने  शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले आहे.

जाहिरात
 अवकाळी पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.काढणीस आलेली पिके पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पंचनामे झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना निदान नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करता येईल.

या पावसाने शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा, टरबूज, आंबा, द्राक्षे तसेच इतर फळबाग पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरांसाठी लागवड करण्यात आलेली मका व चारा पिके देखील पूर्णपणे नष्ट झालेले आहे . त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पोहेगांव  परिसरात बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे गहू पिके जमीनदोस्त झाली आहे . तर शेतकऱ्यांनी शेतात काढलेला कांदा शेतातच भिजला आहे.

जाहिरात
आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला अवकाळीने मोठे नुकसान केले आहे. सध्या व्यापारी देखील शेतकऱ्यांकडून २००० रू क्विंटलने गहू खरेदी करत आहे.तर कांदा हा ५०० रुपये पेक्षाही कमी दराने घेतला जात आहे. अवकाळी पावसाने अजूनही व्यापाऱ्यांकडून भाव कमी होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी व दुहेरी सापडलेल्या संकटाचा सामना कसा करायचा हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

नितीनराव औताडे
यामुळे कोपरगाव तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतामध्ये जाऊन पाहणी करून पंचनामे करावे व शासन दरबारी नुसकानीचा  रिपोर्ट देऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळेल या कामे सहकार्य करावे असेही नितीनराव औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे