अमृतवाहिनी बी फार्मसी च्या ४६ विद्यार्थ्यांची जेनेव्हा बायोफार्मासिटिकल कंपनीमध्ये निवड
अमृतवाहिनी बी फार्मसी च्या ४६ विद्यार्थ्यांची जेनेव्हा बायोफार्मासिटिकल कंपनीमध्ये निवड
जाहिरात
Sangmner vijay kapse दि १ एप्रिल २०२६-—माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील अमृतवाहिनी बी. फार्मसी मधील 46 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वीच जेनोव्हा बायोफार्मासिटिकल लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ एम जे चव्हाण यांनी दिली आहे.
जाहिरात
विद्यार्थ्यांच्या झालेल्या प्लेसमेंट बाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ चव्हाण म्हणाले की, अमृतवाहिनी बी फार्मसी , अमृतवाहिनी शिक्षण संस्था यांचा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर सामंजस्य करार आहे. मेडिकल विभागातील 13 आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार असल्याने विविध कंपन्या महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्यू घेत आहेत.जाहिरात
संस्थेमध्ये स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग कार्यरत असून त्या अंतर्गत विविध चर्चासत्रे, कार्यशाळा याचबरोबर अभ्यासाव्यतिरिक्त कंपनीतील कार्यक्षेली बाबत माहिती दिली जात आहे. तसेच कंपन्यांशी भेट घडून आणली जात असून यामधून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव दिला जात आहे.
जाहिरात
जेनोव्हा बायोफार्मासिटिकल लिमिटेड पुणे या कंपनीचे एचआर मॅनेजर निलेश खैरे आणि संपत आवरे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखत घेतल्या त्यापैकी 46 विद्यार्थ्यांची चांगल्या पॅकेजवर निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या नोकरी कमी प्लेसमेंट अधिकारी डॉ दिनेश हासे, डॉ सचिन गुंजाळ, प्रा. रेश्मा शेळके, माजी विद्यार्थी समन्वयक डॉ संकेत काळमेघ यांनी विशेष प्रयत्न केले.
अमृतवाहिनी बी फार्मसी च्या निवड झालेल्या 46 विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा आ डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे बी गुरव ,प्राचार्य डॉ. एम.जे .चव्हाण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवणे याकरता फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. अद्यावत तंत्रज्ञान, प्रयोगशाळा सुविधा, तसेच विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी उद्योग क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.
शरयूताई देशमुख व्यवस्थापकीय संचालक —————————————————————————————– मुलाखतीपूर्वी घेतलेल्या मॉक इंटरव्यू सॉफ्ट स्किल ट्रेनिंग आणि इंडस्ट्रियल ओरिएंटेड मुले आम्हाला आत्मविश्वास मिळाला महाविद्यालयाच्या आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो