आपला जिल्हा

मोहनीराज नगरच्या पाण्याच्या टाकीची लवकरात लवकर चाचणी घ्या-सचिन परदेशी

मोहनीराज नगरच्या पाण्याच्या टाकीची लवकरात लवकर चाचणी घ्या-सचिन परदेशी

मोहनीराज नगरच्या पाण्याच्या टाकीची लवकरात लवकर चाचणी घ्या-सचिन परदेशी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ एप्रिल २०२६ :-ज्याप्रमाणे कोपरगाव शहरातील १३१.२४ कोटीच्या ब्रिजलाल नगर येथील पाण्याच्या टाकीची चाचणी घेण्यात आली त्याप्रमाणे वितरण व्यवस्थेच्या कामाला गती देवून कोपरगाव शहराच्या बेट भागातील मोहिनीराजनगर मधील पाण्याच्या टाकीची देखील चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी सचिन परदेसी यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

जाहिरात

आमदार आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण होवून ९५ किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचे व पाण्याच्या टाक्यांचे काम अंतिम टप्यात असून नुकतीच ब्रिजलाल नगर येथील पाण्याच्या टाकीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. आणि नेहमीप्रमाणे ज्यांनी फक्त कोपरगावकरांना पाण्याचे स्वप्न दाखविले त्यांचे कार्यकर्ते कोणत्याही प्रकारचे योगदान नसतांना श्रेय घेण्यासाठी १३१.२४ कोटीच्या पाणी योजनेतील वितरण व्यवस्थेच्या कामाची रेबीन कापण्यासाठी सर्वात पुढे येत असले तरी नगरपरिषद प्रशासनाने वितरण व्यवस्थेच्या उर्वरित कामाला गती द्यावी.

जाहिरात

वितरण व्यवस्थेच्या बेट भागातील मोहिनीराज नगर मधील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून या टाकीचे इनलेट आणि आऊट लेटचे काम बेट कमानी पर्यंत पूर्ण झाले आहे. बेट कमान ते पाण्याची टाकी इनलेट आणि रिटन आऊट लेट पाण्याची टाकी ते बेट कमान पर्यंत काम होणे बाकी आहे. सदरचे काम हे ७५२ जी राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असलेली कंपनी करून देणार असून त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित कंपनीला सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करून घेण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पाठपुरावा करावा व मोहिनीराज नगर मधील पाण्याच्या टाकीची चाचणी लवकरात लवकर करून घ्यावी.

सचिन परदेशी

नेहमी प्रमाणे या पाणी योजनेच्या झालेल्या कामावर आयत्या रेघा ओढण्यासाठी काडीचाही संबंध नसणारे सत्ताधारी पदाधिकारी टपून आहेत. परतू प्रशासनाने हे काम निगडीचे व तातडीचे असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदरचे काम पूर्ण करून घ्यावे व पाण्याच्या टाकीची चाचणी करून घेवून बेट व मोहनीराजनगर भागाला स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा लवकरात लवकर कसा होईल यासाठी प्रयत्न करावे असे सचिन परदेसी यांनी शेवटी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे