संजीवनी कॉलेजची १०० टक्के निकालाची परंपरा कायम तर अंजली साळुंके ९३ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

संजीवनी कॉलेजची १०० टक्के निकालाची परंपरा कायम तर अंजली साळुंके ९३ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम
संजीवनी कॉलेजची १०० टक्के निकालाची परंपरा कायम तर अंजली साळुंके ९३ टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

Kopargaon vijay kapse दि ३ मे २०२६- महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२ वीचा ₹निकाल शनिवार दि २ मे रोजी संकेतस्थळावर जाहिर झाला असुन यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या कॉमर्स विभागच्या अंजली ईश्वर साळुंके हिने शेकडा ९३ टक्के गुण मिळवुन महाविद्यालयात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होवुन आपल्या प्रतिभा सपन्नतेचे दर्शन घडविले. संजीवनी ज्यु. कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेचे शिक्षण हे इंग्रजी मध्ये दिले जाते, तरी सुध्दा अंजली हीने उच्चांकी गुण मिळवत संजीवनी मधिल दर्जा व गुणवत्तेची मोहर उमटवली आहे. यंदाही संजीवनीच्या कॉमर्स व सायन्स शाखेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे, अशी माहिती संजीवनी ज्यु कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षा फेब्रुवारी व मार्च २०२६ मध्ये घेतल्या होत्या. कॉमर्स शाखेत ओम अजय बजाज याने ९०. ५० टक्के गुण मिळवुन दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. रिध्दी धनंजय रोहम हिने ८९. १७ टक्के गुण मिळवुन तृतिय क्रमांक मिळविला. क्षितिजा शांतीलाल होन हिने ८८. ५० टक्के व विनाशा सचिन गुजराथी हिने ८५. ५० टक्के गुण मिळवुन अनुक्रमे ४ था व ५ वा गुणानुक्रमांक प्राप्त केला. सायन्स शाखेत शौर्य संतोष थोरात याने ८६.५० टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला. समृध्दी विजय शेळके व वैभव नारायण लचके यांनी अनुक्रमे ८३. ३३ व ८२. ३३ टक्के गुण मिळवुन दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तिर्ण झाले.

सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडविणे हेच संजीवनी ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख ध्येय असून त्या दृष्टीने येथे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकसित केले जात आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच नैतिक मूल्ये, शिस्त, कौशल्य विकास आणि सामाजिक जाणीव यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांना सक्षम बनविले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी संस्थेचे व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची तडजोड न करता सातत्याने प्रयत्नशील आहे. याचे स्पष्ट प्रतिबिंब विविध उपक्रम, सुविधा आणि शैक्षणिक उपक्रमांमधून प्रकर्षाने दिसून येते.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका डॉ मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. तसेच हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नंन्स डॉ. रावसाहेब शेंडगे , प्राचार्या रेखा साळुंके, उपप्राचार्य मोहन सोनवणे व कालिदास अंदोरे यांचेही अभिनंदन केले.



