वारकरी विचार जोपासूनच विखे पाटलांनी केली परिसराची जडणघडण; ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक

वारकरी विचार जोपासूनच विखे पाटलांनी केली परिसराची जडणघडण; ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक
वारकरी विचार जोपासूनच विखे पाटलांनी केली परिसराची जडणघडण; ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक
Loni vijay kapse दि ५ मे २०२६- “ज्ञानोबा-तुकोबांचा विचार जोपासूनच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी या परिसराची जडणघडण केली. कर्तव्यातून त्यांनी आपले वारकरीपणही सिद्ध केले. पवित्र विचारांच्या मागे जायचे असेल, तर आपल्याला उपासना जिवंत ठेवाव्या लागतील. नित्य उपासनेतूनच समाजाची वैचारिक बांधणी होऊ शकेल,” असा संदेश ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभात दिला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्यतिथी आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाचा सांगता समारंभ ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला.

या महोत्सवाच्या निमित्ताने लोणी बुद्रुक गावातील चार प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील आणि ध्रुव विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी श्री म्हसोबा महाराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या भव्य कमानीच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. “कारखाना कार्यस्थळावरील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले.”

“आपल्या मार्गदर्शनपर संदेशात ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की, लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी कीर्तन महोत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून जोपासली आहे. सर्व मंडळी अन्नदानासाठी पुढे येतात, यामध्ये विखे पाटील परिवाराचे योगदान खूप मोठे आहे. सप्ताहाचा कालावधी हा पुण्यकाळ मानला जातो. वर्षानुवर्षे येथे अध्यात्माची पेरणी झाली आहे. पद्मश्रींनी दिलेल्या या विचारांचा संस्कार खासदार साहेब (पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील) पुढे घेऊन गेले. आज या परिवाराची चौथी पिढी वारकरी संप्रदायाच्या कामात योगदान देत आहे.”

“आम्ही राज्यात सर्वत्र जातो, मात्र लोणी बुद्रुक गावाच्या सप्ताहात विखे पाटील परिवाराची उपस्थिती ही खूप लक्षणीय असते, हा अनुभव इतर ठिकाणी येत नाही. मोठ्या माणसांनी घालून दिलेली परंपरा आज पुढची पिढी पुढे घेऊन जात आहे, याचा आनंद वाटतो. छत्रपती शिवरायांचे चरित्र का वाचावे, तर राजेंनी सर्वसामान्य मावळ्यांना आपलेसे केले होते. सामाजिक व राजकीय जीवनात वाटचाल करताना जात, धर्म, पंथ याला थारा न देता विखे कुटुंबीयांचे कार्य अव्याहत सुरू आहे. याचे कारण वारकरी संप्रदाय त्यांच्या रक्तात भिनला असल्याने ही सामाजिक सेवा परमेश्वरच त्यांच्याकडून करून घेत आहे,” असे ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक म्हणाले.

“अनेक वर्षे शेतकऱ्यांसाठी येथे काम होत आहे. खासदार साहेबांनी अनेक वेळा आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली. शेतकरी आमचा पोशिंदा आहे, हा विचार येथील मातीने दिला आहे.” “केवळ कीर्तनात गर्दी करून चालणार नाही, तर आता वारकरी संप्रदायाचा विचार नित्य उपासनेतून आपल्या सर्वांना पुढे न्यावा लागणार आहे. ग्रामीण भागातील अनेक मंदिरांमध्ये आज युवक ‘हनुमान चालीसा’ किंवा अन्य प्रार्थनेतून अध्यात्माचा वारसा जोपासत आहेत, ही अतिशय चांगली बाब आहे. उपासना जिवंत ठेवून या पवित्र विचारांशी आपल्याला जोडलेले राहावे लागणार आहे, असे शेवटी त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.
या सप्ताहाच्या निमित्ताने प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी अभिषेक अविनाश थेटे, आशुतोष रमेश दळे, प्रतीक संतोष बनसोडे, शुभम साहेबराव उगले आणि विकास मच्छिंद्र म्हस्के यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC) चांगले यश संपादन करून, ‘नगररचना अधिकारी’ या पदावर नियुक्ती मिळविली; त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.”
“या कार्यक्रमास कैलास तांबे, चेअरमन नंदकिशोर राठी, विजयराव लगड, सरपंच कल्पना मैड, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सौ. धनश्रीताई विखे पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
“मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा उपक्रमाचे कौतुक करून, या यात्रेचा समारोप महेश्वर येथे अहिल्यादेवींच्या राजवाड्यासमोर झाला. ३०० वर्षांनंतरचे माहेरचे वैभव या जलयात्रेच्या निमित्ताने पुन्हा सर्वांसमोर आले. अहिल्यादेवींचे कार्य जिवंत करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न होता. या यात्रेतील नियोजनाचा नेटकेपणा विखे पाटलांच्या रक्तात वारकरी संप्रदाय भिनल्यामुळेच यशस्वी होऊ शकला.” ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक



