अमृतवाहिनीत घडतात गुणवंत विद्यार्थी; आयसीआयसीआय बँक, प्रादेशिक प्रमुख अनुपम मुखर्जी

अमृतवाहिनीत घडतात गुणवंत विद्यार्थी; आयसीआयसीआय बँक, प्रादेशिक प्रमुख अनुपम मुखर्जी
अमृतवाहिनीत घडतात गुणवंत विद्यार्थी; आयसीआयसीआय बँक, प्रादेशिक प्रमुख अनुपम मुखर्जी
Sangmner vijay kapse दि ६ मे २०२६-अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, संगमनेर येथे आयोजित ‘उड्डाण २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलन व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षात उडान २०२६ वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ३० एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून झाली. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथी यांचा सत्कार महाविद्यालयाचे संचालक डॉ.बी एम लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख उपस्थित होते. तसेच डॉ. सुधीर तांबे व शरयू देशमुख यांचीही उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून आयसीआयसीआय बँकेचे प्रादेशिक प्रमुख अनुपम मुखर्जी आदी मान्यवर पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी साईनाथ दिघे, महाव्यवस्थापक, एजीएम मार्केटिंग, बंसल वायर उपस्थित होते. अशी माहिती अमृतवाहिनी एमबीएचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली.

प्रमुख पाहुणे म्हणून आयसीआयसीआय बँकेचे प्रादेशिक प्रमुख अनुपम मुखर्जी यांनी आपले विचार मांडताना विद्यार्थ्यांनी उच्च स्वप्ने उराशी बाळगून ती सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. तसेच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन सतत वाटचाल करावी. जीवन जगण्याचा फॉर्म्युला सांगितला स्वप्न, विश्वास, यश व्यवस्थापित करा म्हणजे सुयश मिळेल. तुम्हीच तुमचा सर्वात मोठा अडथळा आहात. त्यावर मात करा. तुमच्या मनावर गुंतवणूक करा. तुमच्या मर्यादा वाढवा. तुम्ही स्वतःवर प्रभाव टाकू शकता तुम्ही कोण आहात? तुमचा उद्देश काय आहे? तुमच्या मर्यादा तुमचे जग ओळखा. तुमच्या मर्यादा निवडा, परिभाषित करा. तुमचे स्वतःचे जग तयार करा. ज्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले. त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विशेषतः ग्रामीण भागातील महाविद्यालयात अतिशय योग्य नियोजनबद्ध, व्यवस्थापन राबवून विद्यार्थ्यांची जडणघडण, विकासासाठी महाविद्यालयातील संचालक डॉ. बी. एम लोंढे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्य करतात त्याबद्दल त्या सर्व ए.आय.एम.बी.ए. टीमचे अभिनंदन केले.

यानंतर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. साईनाथ दिघे यांनी आपले विचार मांडताना, आपल्या आयुष्यात चांगली माणसे येतात, वाईट माणसे येतात पण आयुष्यात चांगली माणसे येणे खूप महत्त्वाचे असतात त्याच्यामुळेच आपल्या आयुष्याला वळण देणे शक्य होते..

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उडान २०२६ स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा.डी.बी. वाकचौरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना उड्डाण आणि फेअरवेल या कार्यक्रमाचे प्रास्तविक मांडले.



