देवकवठेच्या जि.प.शाळेच्या चिमुकल्यांची सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये धमाल

देवकवठेच्या जि.प.शाळेच्या चिमुकल्यांची सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये धमाल
जिल्हा परिषद शाळांमधूनच परिपूर्ण विद्यार्थी घडतो – भाऊसाहेब गोरे

Sangmner vijay kapse दि ६ मे २०२६- अहिल्यानगर जिल्ह्याच्या टोकावर असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सांज चिमण पाखरांची या कार्यक्रमांमधून देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवले . बाल चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने मोठी धमाल केली असून सर्व नागरिक भारावले . जिल्हा परिषद शाळांमधूनच खऱ्या अर्थाने परिपूर्ण विद्यार्थी घडतो असे प्रतिपादन आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे यांनी याप्रसंगी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकवठे येथे सांज चिमण पाखरांची या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राजहंस दूध संघाचे संचालक भारत शेठ मुंगसे, एकनाथ शेठ मुंगसे, चित्रपट दिग्दर्शक ॲड बी आर गांडोळे, आयएएस उत्तीर्ण कुमारी ऋतुजा गायकवाड, तळेगाव केंद्रप्रमुख विश्वनाथ खिलारी, अमृत उद्योग समूहाचे नामदेव कहांडळ, राजेंद्र कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, राजेंद्र मुंगसे, शिवराज मुंगसे, कैलास सांगळे, सुनील गुडघे, सरपंच ज्योती मोकळ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब सांगळे ,भाऊसाहेब कहांडळ, मुख्याध्यापिका अनिता सूर्यवंशी प्रफुल्ल मुंगसे राजू खरात सुरेखा मुंगसे, तुकाराम कहांडळ, बाबासाहेब गाजरे, शत्रुघ्न मुंगसे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

गणेश वंदनेने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 65 विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेमधून 22 सांस्कृतिक विविध कार्यक्रम सादर झाले यामध्ये संभाजी या नाटिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा घोड्यावरून झालेला प्रवेश, त्यांना झालेली अटक, भव्य दिव्य सेठ आणि 45 विद्यार्थ्यांच्या एकत्रित पाण्याने सादर झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांच्या अंगावर शहारे आणले. अहिराणी नृत्य, कोळी नृत्य, पंजाबी डान्स, यांसह विविध गीतांनी धमाल केली. वेशभूषा सामूहिक नृत्य भव्य स्टेज आणि दिमागदार सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांचा छोटा बच्चा जानके या 17 विद्यार्थ्यांच्या समूहाने सर्वांना खळखळून हसवले. तर प्रत्येक गाण्यांमध्ये नावीन्यता आणि विविधता असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता ही अव्वल दर्जाची असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
यावेळी बोलताना आदर्श शिक्षक भाऊसाहेब गोरे म्हणाले की, देवकवठे गाव ही कलावंतांची भूमी आहे. प्रतिकूलतेतून अनुकूलता येथे निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळेमधून कायम परिपूर्ण विद्यार्थी घडला जातो. संघर्ष हा त्याला माहीत असतो आणि त्यामुळे तो जीवनात यशस्वी होतो. इंग्रजी आणि गणिताबरोबर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जात असून नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतच आपले विद्यार्थी टाकले पाहिजे असा आग्रही त्यांनी केला.
यावेळी सुधाकर मुंगसे नामदेव शंकर ज्ञानदेव कहांडळ सोमनाथ सांगळे राजाराम मुंगसे, शरद शेवंते, मच्छिंद्र आरोटे ,अशोक गडाख, सौ झुंबरबाई खतोडे, अभिमन्यू मुंगसे सुनील मुंगसे मच्छिंद्र सांगळे ज्ञानेश्वर कुरकुटे ऋषिकेश मुंगसे शुभम मुंगसे अशोक मुंगसे सुभाष मुंगसे यांच्यासह विविध युवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल मुंगसे यांनी केले सूत्रसंचालन गणेश कहांडळ यांनी केले तर भाऊसाहेब सांगळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी देवकवठे सह पंचक्रोशीतील नागरिक महिला व युवकांची मोठी उपस्थिती होती.




