आपला जिल्हा

उन्हाच्या तीव्रतेमुळे नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा; १० मे पासून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याचे मंत्री विखे पाटील यांचे आदेश

उन्हाच्या तीव्रतेमुळे नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा; १० मे पासून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याचे मंत्री विखे पाटील यांचे आदेश

उन्हाच्या तीव्रतेमुळे नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा; १० मे पासून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याचे मंत्री विखे पाटील यांचे आदेश

जाहिरात

Loni vijay kapse दि ७ मे २०२६उन्हाची वाढती तीव्रता आणि नदीकाठच्या गावांमधील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन, दिनांक १० मे २०२६ पासून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जाहिरात

मागील काही दिवसांत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गावांमधील पाण्याचे उद्भव आटल्याने गावपातळीवरील पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत कमी पडू लागले आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पिकांचा प्रश्न गंभीर झाला असून, टंचाईग्रस्त गावांमधून टँकरची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती.

जाहिरात

यावर मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली. तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन दि. १० मे २०२६ पासून प्रवरा नदीपात्रात आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले.

जाहिरात

या निर्णयामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील गावांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याच्या पाण्याचा, शेतीचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होणार आहे. उपलब्ध पाणी अतिशय काटकसरीने वापरावे, पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शेवटच्या गावाला पाणी मिळेपर्यंत जलसंपदा विभागाने सतर्क राहावे, अशा कडक सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे