सीबीएससी परीक्षेत यशस्वी नवोदय विद्यालयातील सृष्टी कोळपेचा आमदार कोल्हे कडून सन्मान
सीबीएससी परीक्षेत यशस्वी नवोदय विद्यालयातील सृष्टी कोळपेचा आमदार कोल्हे कडून सन्मान
सीबीएससी परीक्षेत यशस्वी नवोदय विद्यालयातील सृष्टी कोळपेचा आमदार कोल्हे कडून सन्मान

Kopargaon vijay kapse दि २९ मे २०२६– दहावीच्या सीबीएससी परीक्षेत केंद्रीय पी.एम.श्री जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर ची विद्यार्थिनी तसेच कोळपेवाडी येथील प्रसिद्ध वैद्यकीय दाम्पत्य डॉ.दत्तात्रय कोळपे व डॉ. नयना कोळपे यांची कन्या सृष्टी दत्तात्रय कोळपे हिने ९५ टक्के गुण तसेच मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विधानपरिषदेचे नवनिर्वांचीत आमदार विवेक कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात सन्मान करत तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सामान्य कुटुंबातील डॉ दत्तात्रय कोळपे व डॉ नयांना कोळपे यांना दोन मुली असून या दोन्ही मुलींचे प्राथमिक शिक्षण कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्यालय पूर्ण झाले.त्यांचा दोन्ही मुली सृष्टी व स्वरा यांनी पाचवीच्या वर्गात नवोदय प्रवेश परीक्षेद्वारे केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवत स्पर्धेच्या युगात कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता स्वतःच्या हुशारीवर ग्रामीण भागातील मराठी माध्यमाची विद्यार्थिनींनी असून देखील सृष्टी कोळपे हिने सीबीएससी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले तर त्यांची लहान मुलगी स्वरा देखील त्याच विद्यालयात आठवी मध्ये शिक्षण घेत आहे.

ही बाब नक्कीच कोपरगाव तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोवोद्गार आमदार विवेक कोल्हे यांनी करत सृष्टी व स्वरा तसेच डॉ कोळपे दांपत्याचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह संजीवनी उद्योग समूहाचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





