आपला जिल्हा

सेवानिवृत्तीचा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावती- दीपक गायकवाड

सेवानिवृत्तीचा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावती- दीपक गायकवाड
ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कैलास शेजवळ यांचा सन्मान
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ जुन २०२६–  एखाद्या संस्थेत आपले संपूर्ण आयुष्य घालवत त्या संस्थेच्या भरभराटीसाठी प्रामाणिकपणे अहोरात्र झटत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या  निवृत्ती बद्दल त्याचा मान सन्मान करत त्याने आपल्या कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ट प्रामाणिक कार्याची दखल घेऊन सत्कार करत शुभेच्छा देणे म्हणजे जणू त्याच्या कामाची पावतीच त्याला दिली. असे प्रतिपादन रिपब्लिकन आठवले गटाचे राज्याचे सचिव दीपक गायकवाड यांनी श्री साईबाबा संस्थान मध्ये ४० वर्ष सुरक्षा अधिकारी म्हणून सेवा देत सेवानिवृत्त  झालेले कैलास शेजवळ यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात
 सेवानिवृत्तीनिमित्त कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.परशराम साबळे, भाजपा  प्रदेश सदस्य नानासाहेब शिंदे , यादवराव त्रिभुवन,  मुन्ना शेख, विजय शिंगाडे, सातभाई कॉलेजचे प्रा.विशाल धारणगावकर, प्रा जनार्दन सुपेकर, निलेश देवकर, मुन्ना पठाण, आबा गायकवाड आदी उपस्थित होते.

जाहिरात
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त कैलास शेजवळ यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर डॉ.साबळे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, आज मानवामध्ये शिल्लक असलेल्या प्रामाणिक पणावरच जगाचा कारभार सुरू आहे त्यामुळे सेवेत असताना सचोटीने प्रामाणिक पणे कारभार  केलेले कार्य सेवानिवृत्तीनंतर आपले नाव उज्वल करत असते ते कार्य नक्कीच शेजवळ यांनी केले असून आता उर्वरित आयुष्य त्यांनी स्वतःसाठी कुटुंबासाठी जगत आनंदी राहत आरोग्यमय जपावे अशा शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे