आपला जिल्हा

निकालापूर्वीच अमृतवाहिनी एमबीएच्या ११० विद्यार्थ्यांना नोकरी

निकालापूर्वीच अमृतवाहिनी एमबीएच्या ११० विद्यार्थ्यांना नोकरी
निकालापूर्वीच अमृतवाहिनी एमबीएच्या ११० विद्यार्थ्यांना नोकरी
जाहिरात

Sangmner vijay kapse दि १५ जुन २०२६ : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाने यंदा प्लेसमेंटच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच महावि‌द्यालयातील ११० विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाख ते ८ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज प्राप्त झाले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावर महावि‌द्यालयाचा भर असून, याच प्रयत्नांचे हे फलित असल्याचे अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी सांगितले.

जाहिरात

या विध्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), कोटक महिंद्रा बँक, इंडियामार्ट, डी-मार्ट, एमफॅसिस, टाटा रॅलिस इंडिया, मणप्पुरम फायनान्स, केएसबी लिमिटेड, सोलर स्क्वेअर एनर्जी, बन्सल वायर इंडस्ट्रीज हाऊसी की मॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ऊर्जा फूड्स अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, प्लेयर्स एनर्जी एलएलपी, स्नेह प्रीकास्टो अॅड कॉन्सटो सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड, वाणी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, सह्याद्री अग्रोव्हेट एसयमबीएसटी, सुप्रीम पॅकेजिंग लिमिटेड, बिर्ला फायनान्स तसेच इतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

जाहिरात

अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाची स्थापना १९९४-९५ मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून झाली. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महावि‌द्यालयाने शैक्षणिक, संशोधन आणि प्लेसमेंट क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. महावि‌द्यालयाला NAAC चे ‘A’ ग्रेड मानांकन प्राप्त झाले असून, व्यवस्थापनशास्त्रातील संशोधन केंद्र म्हणूनही मान्यता मिळालेली आहे.

जाहिरात

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अत्याधुनिक ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, प्लेसमेंट कक्ष, वसतिगृह, क्रीडांगण आणि हरित परिसर अशा विविध सुविधा महावि‌द्यालयात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील वि‌द्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच उ‌द्योजक घडविण्याचे कार्यही महाविद्यालयाकडून केले जात आहे.

या यशस्वी प्लेसमेंट उपक्रमासाठी संचालक डॉ. बी. एम. लोंढे, प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. रविंद्र. गवळी आणि प्रा. विजय थोरात, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

या सर्व निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात (माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयु देशमुख, साखर कारखान्याचे संचालक  इंद्रजीत भाऊ थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी. गुरव यांनी अभिनंदन केले.

“ग्रामीण भागातील वि‌द्यार्थ्यांना गुणवतापूर्ण शिक्षणासह करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या अमृतवाहिनीच्या ध्येयाला हे यश अधोरेखित करणारे आहे,” असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे