आपला जिल्हा

अमृतवाहिनी आयटीआयच्या २४३ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी नामांकित कंपन्यांमध्ये निवड

अमृतवाहिनी आयटीआयच्या २४३ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी नामांकित कंपन्यांमध्ये निवड
अमृतवाहिनी आयटीआयच्या २४३ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी नामांकित कंपन्यांमध्ये निवड
जाहिरात

Sangmner vijay kapse दि २३ जुन २०२६अमृतवाहिनी आयटीआय ,अमृतनगर येथे दिनांक 11 जून 2026 रोजी नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू झाले यात सुमारे 243 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी  कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.

जाहिरात
     याविषयी अधिक माहिती देताना भाटे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्थ सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता अमृतवाहिनीच्या 243 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
      नामांकित कंपन्यांनी अंतिम वर्षाच्या मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, फिटर इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेनच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यात महिंद्रा अँड महिंद्रा, नाशिक मध्ये 80 विद्यार्थी, महिंद्रा अँड महिंद्रा,चाकण येथे 86 विद्यार्थी, मरेली मदर्सन लाईटींग इंडिया या कंपनीत 40 विद्यार्थी, मल्टीकाँटन्स इंडस्ट्रियल कंट्रोल ,सिन्नर मध्ये 15, जे बी एम ग्रुप, सिन्नर मध्ये 22 विद्यार्थी अशा एकूण 243 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

जाहिरात

       लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत निसर्गरम्य सुंदर परिसर, अत्याधुनिक सुविधा आणि प्लेसमेंट साठी परिपूर्ण प्रयत्न असल्याने संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या पगारावर थेट नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.
          या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,विश्वस्त मा. आ. डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे , प्राध्यापक व्ही.बी धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य विलास भाटे आदींनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे