टीईटी,नीट पेपर फुटी प्रकरणी एनएसयुआयचे निवेदन

टीईटी,नीट पेपर फुटी प्रकरणी एनएसयुआयचे निवेदन


या निवेदनात म्हटले आहे की, नीट आणि टीईटी सारख्या परीक्षांसाठी विद्यार्थी खूप परिश्रम करतात मात्र पेपर फुटी मुळे सर्वांचा भ्रमनिरास होतो. अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात. वर्षभर कष्ट करताना त्यांचा प्रवास खर्च, राहण्याचा खर्च , जेवणाचा खर्च,फॉर्म फी, मानसिक तणाव या सगळ्या बाबींचा त्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होतो इतके करूनही तो कष्ट करतो आणि अचानक पेपर फुटी मुळे त्याचा अपेक्षाभंग होतो यामध्ये अनेक दलाल पैसे कमवत असून यामुळे शिक्षण क्षेत्र हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.

त्यामुळे शासनाने भविष्यात पेपर फुटी थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी अधिक पारदर्शकता राबवावी व या प्रकरणी उच्चस्तरीय निपक्षपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच फेर परीक्षेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी एन एस यु आय व युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते



