आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना राजगिरा लाडू खाण्याची चाहूल; सर्व दिंडी भाविकांना राजगिरा लाडू ला पसंती

आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना राजगिरा लाडू खाण्याची चाहूल; सर्व दिंडी भाविकांना राजगिरा लाडू ला पसंती
आषाढी एकादशीनिमित्त भाविकांना राजगिरा लाडू खाण्याची चाहूल; सर्व दिंडी भाविकांना राजगिरा लाडू ला पसंती

Kopargaon vijay kapse दि १२ जुलै २०२६–यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून आषाढी एकादशीनिमित्त शहरी आणि ग्रामीण भागातून घराघरातून प्रत्येक व्यक्ती आषाढी एकादशीनिमित्त दिंडीस पायी जाण्यास इच्छुक दिसून येत आहे यावर्षी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी ही बघण्यास मिळत आहे तसेच प्रत्येक दिंडीला अन्नदाते हे मोठ्या संख्येने त्यांना राजगिरा लाडू उपवासाचा चिवडा साबुदाणा खिचडी भगर असे विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी इच्छुक असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजगिरा लाडू बनवणारा कालांश महिला गृह उद्योग यावेळेस अध्यक्ष रेणुका काळे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील सगळ्या कानाकोपऱ्यातून लाडूची मागणी ही त्यांना मिळत आहे दरवर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणात यावर्षी त्याचे उत्पादन करण्यात येत आहे याच कारणाने महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे साधारण दिवसाला अडीच लाख लाडू बनवणे सुरू आहे असा अंदाज आहे की आषाढी एकादशी पर्यंत 20-22 लाख लाडू बनवण्याचे कामगिरी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला या करत आहे शुद्ध गूळ वापरून आणि शुद्ध पद्धतीचा राजगिरा वापरून स्वच्छता आणि प्रामाणिकपणे आपल्या सर्व भाविकांपर्यंत हा लाडू पोहोचवण्याचे काम कालांश महिला गृह उद्योग आणि बचत गट यांनी हाती घेतले आहे.

यामध्ये साधारण 90 महिला कामगिरी निभावत आहे आपल्या ग्राहकांना चांगली चव आणि शुद्ध राजगिरा लाडू मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहे या वेळेस महिला उद्योगाच्या अध्यक्ष रेणुका काळे, तसेच रोहित काळे आणि विनय काले यांनी सांगितले





