आपला जिल्हा

लायन्स क्लब व मुंदडा परिवाराच्या वतीने करंजी शाळेस वॉटर प्युरिफायर मशीन भेट

लायन्स क्लब व मुंदडा परिवाराच्या वतीने करंजी शाळेस वॉटर प्युरिफायर मशीन भेट
लायन्स, लिनेस व लिओ क्लब व मुंदडा परिवाराचा संयुक्त उपक्रम
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ११ जुलै २०२६नेहमीच सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आंतरराष्ट्रीय लायन्स,लीनेस व लिओ क्लब कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तथा कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक सत्येन मुंदडा यांच्या भगिनी स्व. शिल्पराणी सुभाष मुंदडा यांच्या स्मरणार्थ मुंदडा परिवारांच्या वतीने करंजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध सुरक्षित स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या उदात्त हेतूने अत्याधुनिक असे वॉटर प्युरिफायर  पाणी शुद्धीकरण मशीन भेट म्हणून देण्यात आले.

 गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र आगवण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि ११ जुलै रोजी लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य मार्गदर्शक माजी नगरसेवक सत्येन मुंदडा, क्लबचे अध्यक्ष सचिन भडकवाडे, माजी अध्यक्ष अक्षय गिरमे, उपसरपंच शिवाजी जाधव, मुख्याध्यापक प्रदीप भाकरे आदींच्या शुभहस्ते लोकार्पण करत शालेय परिसरात पेरू व आंबा या फळझाडांचे रोपण करण्यात आले.
याप्रसंगी लिनेस क्लबच्या अध्यक्षा सोनाली गिरमे, सचिव शीला राशीनकर, लायन्सचे सचिव दीपक जाधव, खजिनदार किरण शिरोडे, माजी सचिव संदीप राशीनकर, लिओ क्लबचे अध्यक्ष करण शहा, सचिव सम्यक फुलफगर, खजिनदार ओम जाधव, गणेश उदावंत यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे, उपाध्यक्ष रघुनाथ कापसे, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सुनील देसाई, बळीराम थेटे, वॉटर पुरिफायर टेक्निशियन अनिल दवंगे,बळीराम थेटे  तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका सचिव तथा माजी विद्यार्थी समितीचे उपाध्यक्ष प्रा. विजय कापसे आदींसह लायन्स, लिनेस व लिओ क्लब कोपरगावचे पदाधिकारी सदस्य, शालेय शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
 या प्रसंगी लायन्सचे माजी अध्यक्ष अक्षय गिरमे, अध्यक्ष सचिन भडकवाडे, लिनेसच्या अध्यक्षा सोनाली गिरमे यांनी  लायन्स,लिनेस व लिओ क्लबच्या कार्याची माहिती उपस्थितीतांना  सांगत विद्यार्थ्यांना शिस्त अभ्यास वेळ स्वच्छता वृक्ष संवर्धन भविष्य याचे महत्व सांगितले तर सत्येन मुंदडा यांनी शालेय परिसराचे व शाळेचे कौतुक करत आनंद व्यक्त करत भविष्यात देखील शाळेला आवश्यक ती मदत करू असे आश्वासन दिले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय कापसे, स्वागत सरपंच रवींद्र आगवन, आभार उपसरपंच शिवाजी जाधव यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदीप भाकरे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक, लायन्स, लिनेस, व लिओ क्लबच्या सदस्य पदाधिकाऱ्यांनी अथक  परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे