डायल ११२ चा गैरवापर, पोलिसांची दिशाभूल; एकावर गुन्हा दाखल

डायल ११२ चा गैरवापर, पोलिसांची दिशाभूल; एकावर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर छगन भागवत (रा. सावळगाव, ता. कोपरगाव) याने ३१ जुलै रोजी डायल ११२ वर कॉल करून शिरसगाव येथील एका दुकानात गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार युवराज खुळे यांनी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देत सागर भागवत याने दाखविलेल्या ठिकाणी स्थानिक २ पंचांच्या उपस्थितीत शिरसगाव बसस्थानका समोरील प्रियंका जनरल स्टोअर्स या दुकानाची झडती घेतली मात्र, तपासादरम्यान दुकानात कोणताही गुटखा किंवा अन्य प्रतिबंधित पदार्थ आढळून आला नाही.

डायल ११२ हा आपत्कालीन सेवेसाठीचा क्रमांक आहे. त्यामुळे यावर खोटी माहिती देणे, विनाकारण कॉल करणे किंवा डायल ११२ चा गैरवापर करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.
अशा प्रकारच्या कृत्यांची नोंद घेऊन संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.त्यामुळे सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून डायल ११२ चा वापर फक्त वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच करावा.संभाजी गायकवाड ग्रामीण पोलिस निरीक्षक कोपरगाव






