मॉली समदडियाची राष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड

मॉली समदडियाची राष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड
मॉली समदडियाची राष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड

Kopargaon vijay kapse दि ५ ऑगस्ट २०२६ : कोपरगाव येथील प्रज्वल्स योगा अकॅडमीच्या विद्यार्थिनी मॉली अखिलेश समदडिया हिने उल्लेखनीय कामगिरी करत सिबीएससी नेशनल योगा चॅम्पियनशिप २०२६ साठी पात्रता मिळवली आहे. हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. नुकत्याच लोणावळा येथील सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये आयोजित सिबीएससी साऊथ झोन योगा चॅम्पियनशिप स्पर्धेत मॉलीने ट्रॅडिशनल इंडिव्हिजिवल प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण केले. तिच्या अचूक आसनरचना, संतुलन आणि आत्मविश्वासपूर्ण प्रदर्शनाची परीक्षकांनी दखल घेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड जाहीर केली.

मॉलीच्या या यशामागे प्रज्वल्स योगा अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय योगपटू प्रज्वल आदिनाथ ढाकणे तसेच प्रशिक्षक विशाल अरुण पंडोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि जिद्दीच्या बळावर तिने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल प्रज्वल्स योगा अकॅडमीतर्फे मॉली व तिच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत मॉली महाराष्ट्रासह कोपरगाव परिसराचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त करत तिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.



