डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते निसर्गरम्य तामकड्याचे जलपूजन

डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते निसर्गरम्य तामकड्याचे जलपूजन
पावसाळ्यात प्रवाहित झालेला तामकडा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण; सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन

Sangmner vijay kapse दि १० ऑगस्ट २०२६ : नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाट परिसरातील आनंदवाडी येथील निसर्गरम्य तामकडा धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला आहे. या तामकड्याचे जलपूजन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला हा परिसर पर्यटकांसाठी आनंददायी ठरत असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.

चंदनापुरी आनंदवाडी येथील तामकडा पाण्याचे जलपूजन झाल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर व अकोले तालुका सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमुळे चंदनापुरी घाट आणि परिसराला निसर्गाचे सुंदर वरदान लाभले आहे. बाळेश्वर परिसरातून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहामुळे घाटामध्ये तामकडा निर्माण झाला असून, पावसाळ्यात तो प्रवाहित होतो. हिरव्यागार वनराईच्या कुशीतून पांढराशुभ्र वाहणारा तामकडा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

नाशिक-पुणे महामार्ग हा प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन घाट परिसरात अद्ययावत रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे अनेक पर्यटक तामकडा परिसरात थांबून निसर्गाचा आनंद घेतात. संगमनेर तसेच जुन्नर तालुक्यातूनही अनेक नागरिक येथे पर्यटनासाठी येतात. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. विशेषतः तरुणांनी सेल्फी घेण्याचा मोह टाळावा, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील ओढे, नद्या आणि जलस्रोतांवर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केल्यामुळे मोठी जलसंपत्ती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी बंधारे व नालाबांधणीची कामे झाल्याने पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात होत आहे. ‘पाणीबचत हीच पाणीनिर्मिती’ असून, भविष्यात कमी पाण्यात अधिक शेती उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी थोरात कारखान्याचे संचालक विजय राहणे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात विविध बंधारे बांधण्यात आल्याने मोठी जलसमृद्धी निर्माण झाली आहे. तामकडा हा आनंदवाडी व चंदनापुरी गावांसाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विजय राहणे, कैलास सरोदे, अनिल कढणे, मुरलीधर सरोदे, पप्पू गोसावी, विनोद राहणे, दगू राहणे, ज्ञानेश्वर सरोदे, निलेश सरोदे, अर्चना भालेराव, जयसिंग सरोदे, नंदू राहणे, सोमनाथ सरोदे, भाऊराव राहणे, बबन सरोदे, बाबाजी सरोदे, जगन राहणे, रविराज सरोदे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


