आपला जिल्हा
भाजपा प्रदेश महामंत्री सुनील राणे यांचा कोपरगांव मंडलातील टाकळी येथे ‘शेतकरी संवाद’


Kopargaon vijay kapse दि २१ ऑगस्ट २०२६-कोपरगाव मंडलातील टाकळी येथे भाजपा प्रदेश महामंत्री मा.आ.सुनील राणे यांनी आमदार विवेक कोल्हे यांच्या समवेत शेतकरी संवाद उपक्रमातून उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.पीक कर्ज, पीक विमा, हमीभाव, पाटपाणी, सिंचन, पाणी व्यवस्थापन, शेतीमालाची बाजारपेठ आणि शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.प्रदेश महामंत्री थेट शेतकरी संवादासाठी आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते.







