नामांतराची प्रभावी अंमलबजावणी करा; सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार : सचिन कोळपे

नामांतराची प्रभावी अंमलबजावणी करा; सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार : सचिन कोळपे
नामांतराची प्रभावी अंमलबजावणी करा; सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार : सचिन कोळपे

Kopargaon vijay kapse दि २८ ऑगस्ट २०२६ : जिल्ह्याच्या नामांतराची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असल्याचे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबईचे जिल्हाध्यक्ष सचिन मिरानामदेव कोळपे यांनी सांगितले.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ मे २०२३ रोजी चोंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शासन आदेशही काढण्यात आला. मात्र तीन वर्षांनंतरही अनेक शासकीय कार्यालये, फलक, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जुनाच उल्लेख असल्याचे कोळपे यांनी निदर्शनास आणून दिले.

नामांतराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच सर्व शासकीय विभागांनी आवश्यक कार्यवाही करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील पतसंस्था व विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनीही आपल्या स्तरावर नामांतराची अंमलबजावणी करावी. या विषयाबाबत महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या माध्यमातून जिल्हाभर जनजागृती करण्यात येणार असून, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी नामांतराच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोळपे यांनी केले.




