आपला जिल्हा

संजीवनी सहकारी पतसंस्थेला ४ कोटी २ लाखांचा नफा; सभासदांना १५ टक्के लाभांश;४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सलग ४२ वर्षे ‘अ’ ऑडिट वर्गाची परंपरा कायम 

संजीवनी सहकारी पतसंस्थेला ४ कोटी २ लाखांचा नफा; सभासदांना १५ टक्के लाभांश;४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सलग ४२ वर्षे ‘अ’ ऑडिट वर्गाची परंपरा कायम 
संजीवनी सहकारी पतसंस्थेला ४ कोटी २ लाखांचा नफा; सभासदांना १५ टक्के लाभांश;४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सलग ४२ वर्षे ‘अ’ ऑडिट वर्गाची परंपरा कायम 
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २ सप्टेंबर २०२६संजीवनी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४ कोटी २ लाख रुपयांचा नफा मिळवित आर्थिक प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे. संस्थेने सलग ४२ वर्षे ‘अ’ ऑडिट वर्ग मिळविण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली असून, सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी संस्थापक म्हणून उभारलेल्या संजीवनी उद्योग समूहातील या पतसंस्थेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सहजानंदनगर येथे उत्साहात संपन्न झाली.

जाहिरात
सभेत उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन करताना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे म्हणाले की, गेल्या चार-पाच वर्षांत सहकार क्षेत्रासमोर अनेक संकटे उभी राहिली. कोरोना महामारी, आर्थिक मंदी, दुष्काळ आणि महागाईमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला. वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकरीही अडचणीत आला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही संजीवनी सहकारी पतसंस्थेने सभासद आणि जनतेचा विश्वास कायम ठेवत आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. दुष्काळ, महागाई आणि आर्थिक मंदीचा फटका बाजारपेठेला बसला असतानाही संस्थेने आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवले, असे त्यांनी सांगितले.

जाहिरात
संस्थेचे चेअरमन राजेश परजणे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा मांडला. सन २०२५-२६ अखेर संस्थेकडे २०३ कोटी ३९ लाख रुपयांच्या ठेवी असून, १५६ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच संस्थेची ७५ कोटी ८० लाख रुपयांची गुंतवणूक असून, या आर्थिक वर्षात ४ कोटी २ लाख रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असून, सलग ४२ वर्षे ‘अ’ ऑडिट वर्ग मिळणे ही संस्थेच्या आर्थिक शिस्तीची आणि विश्वासार्हतेची पावती असल्याचे  परजणे यांनी सांगितले.

जाहिरात
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. व्ही. रोहमारे यांनी सभेसमोर संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी युवा नेते आमदार विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नितीनदादा कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर परजणे यांच्यासह अरुणदादा येवले, शिवाजीराव वक्ते, बाळासाहेब वक्ते, संजयराव होन, आप्पासाहेब दवंगे, केशवराव भवर, राजेंद्र कोळपे, रमेश घोडेराव, त्र्यंबकराव सरोदे, साहेबराव पाटील कदम, विलासराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
तसेच साई संजीवनी बँकेचे चेअरमन शरदनाना थोरात, व्हाईस चेअरमन सुरेश जाधव, संस्थेचे आजी-माजी संचालक, पतसंस्थेचे सर्व संचालक, तालुका संघाचे चेअरमन अंबादास पाटील देवकर व त्यांचे सहकारी तसेच संजीवनी सहकारी पतसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी संस्थेचे चेअरमन राजेश परजणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे