के. बी. रोहमारे महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
के. बी. रोहमारे महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप
वाढदिवसानिमित्त वहीतुला; गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

Kopargaon vijay kapse दि २ सप्टेंबर २०२६: श्रीमती रजनीताई दत्तात्रय नलगे यांच्या ७७व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव पंचायत समितीचे माजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी संतोष दत्तात्रय नलगे व सी. डी. जैन महाविद्यालयाचे लॅब असिस्टंट संदीप दत्तात्रय नलगे यांच्या वतीने के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

वाढदिवसानिमित्त श्रीमती रजनीताई नलगे यांची भव्य वहीतुला करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक संचात सहा वह्या याप्रमाणे एकूण २५ संच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नलगे बंधूंनी वाढदिवसाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी असून, या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





