संगमनेर बसस्थानकाचे मुख्य गेट बंद झाल्याने जनतेचे हाल; दिवसभर वाहतूक कोंडी

संगमनेरात अजब प्रकार, महायुतीच्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेची अडवणूक, राज्यभरातून प्रतिक्रिया

संगमनेर शहरी व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे दररोज लाखो नागरिकांची वर्दळ संगमनेर शहरांमध्ये असते. हायटेक बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाणी असून पूर्वेच्या बाजूने मुख्य दरवाजा आहे. मात्र महायुतीचे सध्याचे सत्ताधारी यांनी दहीहंडीच्या नावाखाली हे गेट बंद करण्याचा अट्टाहास केला. आणि त्याला प्रशासन बळी पडले. संगमनेर मध्ये असे प्रकार कधीही झाले नव्हते यामुळे बसस्थानकावरील सर्व व्यापारी, नागरिक शालेय विद्यार्थी महिला व बाहेरून येणारे प्रवासी यांचे मोठे हाल झाले.

नाशिक पुणे नाशिक अहिल्यानगर यांचा उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे संगमनेर हे मध्यवर्ती केंद्र आहे. या ठिकाणाहून बसच्या शेकडो फेऱ्या होत असतात. या सर्व फेऱ्या अकोला रोडच्या बाजूने वळवल्याने सर्व बाजूने दिवसभर शहरांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली. आणि याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागला.

यामध्ये शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक , महिला यांनाही मोठा त्रास झाला. चौकशी केली असता या ठिकाणी विद्यमान सत्ताधारी आमदार यांची दहीहंडी असल्याने हे गेट बंद करण्यात आल्याचे एसटी डेपो प्रशासनाने सांगितले. यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत.

यापूर्वी अशी कधीही गेट बंदी केली नव्हती. सणांना हिंदू संस्कृतीमध्ये मोठे महत्त्व आहे. मात्र आताताईपणा करत सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा अजब प्रकार संगमनेर मध्ये घडला आहे. नुकतेच पुण्यामध्ये डीजेविरुद्ध आंदोलन झाले आणि सन साजरे करण्यामध्ये डीजे किंवा सर्वसामान्य त्रास होऊ नये अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होऊ लागली. या मागणीला संगमनेर मधून हरताळ फासला जात असून आता डायरेक्ट एसटीचे गेट बंद करण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली आहे.
हा अत्यंत गैरप्रकार असून सर्वसामान्य त्रास देण्याच्या असल्याचे सोमेश्वर दिवटे ,निखिल पापडेजा, विद्यार्थी संघटनेचे अनिकेत घुले, संकेत गुंजाळ, राजेश क्षीरसागर, पल्लवी सोनवणे, प्रतीक्षा गुंजाळ, ज्ञानेश्वरी मुंगसे यांच्यासह संगमनेर तालुका प्रवासी संघटना, विद्यार्थी संघटना ज्येष्ठ नागरिक संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
हा अजब प्रकार
संगमनेर बसस्थानक हे मध्यवर्ती आणि सर्वांच्या सोयीचे आहे. मात्र राजकारणासाठी त्याचा वापर अत्यंत चुकीचा आहे .यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांना त्रास झाला असून चढ-उतार व झालेल्या वाहतूक कोंडीमुळे माझा पेपर बुडाला आहे .याची सर्वस्वी जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून असे प्रकार परत होऊ नये अन्यथा या ठिकाणी उपोषण करण्यात येईल– कार्तिकी थोरात
एस वाय बी एस सी विद्यार्थिनी



