आपला जिल्हा

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा 

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा

के.जे.सोमैया महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ११ सप्टेंबर २०२६कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जाहिरात

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे ध्वजारोहण महाविद्यालय विकास समिति चे सदस्य मा. राजेश ठोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अँड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, मा. सुरेश शिंदे, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात सर्व देशवासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांनाच असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या त्याग, बलिदान आणि राष्ट्रभक्तीमुळे आपण आज स्वतंत्र भारतात अभिमानाने जगत आहोत. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत राष्ट्राची एकता, अखंडता आणि संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प आज आपण करूया. भारतासारख्या सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असणाऱ्या खंडप्राय देशाला एका धाग्यात बांधण्याचे काम राज्यघटनेने केले आहे. भारताची राज्यघटना ही भारताचा सर्वोच्च कायदा आहे. ही राज्यघटना कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असल्याचे सांगुन आपण सर्वांनी या संविधानाचे पालन करून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान दिले पाहिजे असे नमूद केले.

जाहिरात

ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  राजेश ठोळे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या सर्वच विराना अभिवादन केले. आजच्या तरुण पिढीने देशाप्रती समर्पण भावना ठेऊन कर्तव्य केले तर देश नक्कीच महासत्ता होईल असेही त्यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेना विभागातील अनेक छात्र सैनिकांना त्यांनी मिळविलेल्या नैपुण्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत व कलागुण सादर केले. स्वातंत्र्य दिनाच्या विविध उपक्रमांसाठी  राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ. नितिन शिंदे, लेफ्टनंट  वर्षा आहेर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र बनसोडे, क्रीडा विभागप्रमुख डॉ सुनिल कुटे, प्रा. मिलिंद कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे