आपला जिल्हा
घुलेवाडी ग्रामस्थांच्या पाठपुराव्यातून कानिफनाथ देवस्थानला इनाम जमीन

घुलेवाडी ग्रामस्थांच्या पाठपुराव्यातून कानिफनाथ देवस्थानला इनाम जमीन

Sangmner vijay kapse दि ११ सप्टेंबर २०२६ – घुलेवाडी गावचे आराध्य दैवत कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज देवस्थान ट्रस्टच्या इनाम जमिनीसाठी गावातील नागरिकांनी एकोप्याने सातत्याने पाठपुरावा केला.योग्य कायदेशीर लढाई केली, त्यामुळे या लढ्याला मिळालेले यश हे केवळ आणि केवळ गावकऱ्यांचे असून यामध्ये ज्यांचे श्रेय नाही अशा मंडळींनी श्रेयवादाचे राजकारण करू नये व धार्मिक कार्यात राजकारण आणणे व विनाकारण लुडबुड करणं गैर असल्याचे भाविकांचे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.






