आपला जिल्हा

संगमनेरात महायुतीच्या अनाधिकृत फ्लेक्सबाजीमुळे गणेश भक्तांमध्ये मोठी नाराजी

संगमनेरात महायुतीच्या अनाधिकृत फ्लेक्सबाजीमुळे गणेश भक्तांमध्ये मोठी नाराजी
संगमनेरात महायुतीच्या अनाधिकृत फ्लेक्सबाजीमुळे गणेश भक्तांमध्ये मोठी नाराजी
Sangmner vijay kapse दि १५ सप्टेंबर २०२६ माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे वैभवशाली आणि आर्थिक संपन्न बनले आहे. शेतकरी व्यापारी विद्यार्थी नागरिक महिला या सर्वांसाठी हे शहर अत्यंत वैभवशाली असून गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरात नागरिकांची मोठी गर्दी झाली मात्र महायुतीच्या अनाधिकृत फ्लेक्समुळे वाहतूक कोंडीसह शहराचे विद्रूपीकरण होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

जाहिरात
संगमनेर शहर हे सुसंस्कृत व आर्थिक दृष्ट्या संपन्न शहर म्हणून ओळखले जाते यामुळे नागरिकांची राहण्यासाठी शहरांमध्ये पहिली पसंती आहे याचबरोबर मोठी बाजारपेठ विश्वास प्रामाणिकपणा यामुळे आजूबाजूच्या तालुक्यांमधील नागरिक ही खरेदीसाठी मोठ्या संख्येने संगमनेर शहर मध्ये येत असतात दररोज सुमारे दोन लाख नागरिकांची वर्दळ शहरांमध्ये असते.

जाहिरात

गणेश उत्सवाच्या निमित्ताने संगमनेर शहरांमध्ये खरेदीसाठी व देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे पहिल्या दिवशी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अनाधिकृतपणे सर्वत्र फ्लेक्स बाजी केल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. विविध ठिकाणी फ्लेक्स व कमानी लावण्यात आले आहे. यांची कोणतीही परवानगी नगरपालिकेकडून घेतलेली नाही. दादागिरी केली जात आहे. यामुळे गणेश भक्त व नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

जाहिरात

2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फ्लेक्स बाजी मुळे विद्रूपीकरण केले होते. यावर तालुक्यातून आणि शहरातून मोठा संताप निर्माण झाला होता.

यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी फ्लेक्स बंदी बाबत आवाज उठवला. नगरपालिकेने अनधिकृत फ्लेक्स वर बंदी घातली मात्र तरीही सत्तेचा वापर करून महायुतीचे पदाधिकारी कोणतीही परवानगी न घेता फ्लेक्स बाजी करत आहे.

जाहिरात

याउलट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ही महसूल मंत्री असताना त्यांनी स्वतः उभे राहून स्वतःचे फ्लेक्स काढले होते. शहरांमध्ये व्यापारी मोठ्या संख्येने असून या फ्लेक्समुळे वाहतूक कोंडीसह त्यांच्या व्यापारावर परिणाम होत आहे त्यामुळे व्यापारी वर्गातही नाराजी आहे.

महायुतीचे पदाधिकारी कोणतेही विकास कामे करत नाहीत फक्त फ्लेक्स बाजी करतात या फ्लेक्स साठी पैसा येतो कुठून असा सवाल गणेश नगर मधील रहिवासी सागर गुंजाळ यांनी विचारला आहे.

कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून फ्लेक्स बाजी

संगमनेर मध्ये यापूर्वी अशी फ्लेक्स बाजी कधी होत नव्हती. मात्र आता जेथे तेथे महायुतीचे फ्लेक्स लावले जातात. या फ्लेक्स साठी पैसे कॉन्ट्रॅक्टर देतात. ही नेमकी काय भानगड आहे हे कळत नाही. कामे करा फक्त फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करण्याची गरज काय असा संतप्त सवाल आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते किसनराव माघाडे यांनी विचारला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे