आपला जिल्हा

डॉ. माधुरी जावळे व डॉ. निलेश सदाफळ ‘इंजिनिअरिंग अचिव्हमेंट अवॉर्ड २०२६’ने सन्मानित

डॉ. माधुरी जावळे व डॉ. निलेश सदाफळ ‘इंजिनिअरिंग अचिव्हमेंट अवॉर्ड २०२६’ने सन्मानित

अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स’कडून दखल

Kopargaon vijay kapse दि २१ सप्टेंबर २०२६: संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. माधुरी जावळे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. निलेश सदाफळ यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘इंजिनिअरिंग अचिव्हमेंट अवॉर्ड २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जाहिरात

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), अहिल्यानगर लोकल सेंटरच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावसायिक योगदान, संशोधन व विकास, संस्थात्मक व सामाजिक प्रभाव तसेच कारकिर्दीतील उल्लेखनीय यश या निकषांच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन, विद्यार्थी विकास तसेच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये केलेल्या योगदानाची दखल घेत डॉ. माधुरी जावळे व डॉ. निलेश सदाफळ यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे यांनी अभिनंदन केले. तसेच संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात दोघांचा सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते आणि हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे उपस्थित होते.

जाहिरात

डॉ. माधुरी जावळे यांना यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’, ‘बेस्ट इनोव्हेटिव्ह टीचर’, आयएसटीईचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज टीचर’ तसेच इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सकडून ‘बेस्ट लेडी टीचर’ अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

या पुरस्कारामुळे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व नवोपक्रमात्मक कार्याला आणखी चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

 

‘रुरल टू ग्लोबल’ संकल्पनेला गुणवंत शिक्षकांच्या कार्याची बळकटी

“संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांचे अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमातील उल्लेखनीय योगदान ही संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. माधुरी जावळे व डॉ. निलेश सदाफळ यांना मिळालेला ‘इंजिनिअरिंग अचिव्हमेंट अवॉर्ड २०२६’ हा त्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्याचा गौरव आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संशोधन, तंत्रज्ञान आणि नवसंकल्पनांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची प्रेरणा देणारा हा सन्मान आहे. ‘रुरल टू ग्लोबल’ या संजीवनीच्या संकल्पनेला अशा गुणवंत शिक्षकांचे कार्य निश्चितच अधिक बळकटी देते.”

—  अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे