आपला जिल्हा

पावसाने पाठ फिरवली; बळीराजा संकटात, कोपरगाव दुष्काळग्रस्त जाहीर करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

पावसाने पाठ फिरवली; बळीराजा संकटात, कोपरगाव दुष्काळग्रस्त जाहीर करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

पावसाने पाठ फिरवली; बळीराजा संकटात, कोपरगाव दुष्काळग्रस्त जाहीर करा; आ. आशुतोष काळेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २१ सप्टेंबर २०२६- कोपरगाव मतदारसंघात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांसह फळबागा, चारा पिकांना मोठा फटका बसला असून भूजलपातळीही झपाट्याने खालावत आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन कोपरगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात

निवेदनात आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव मतदारसंघ हा अवर्षणप्रवण भाग असून दरवर्षी येथे तुलनेने कमी पर्जन्यमान असते. यावर्षी मात्र पावसाचा मोठा खंड पडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. जून नंतर जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला; मात्र त्यानंतर ऑगस्ट महिनाही बहुतांश कोरडा गेल्याने गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे.
पावसा अभावी सोयाबीन, मका, बाजरी, कापूस तसेच चारा पिकांवर विपरीत परिणाम झाला असून फळबागांनाही पाण्याचा ताण सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने शेतातील उभी पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कष्टाचे पीक वाया जाण्याची वेळ आली असून बळीराजा हवालदिल झाला आहे.

जाहिरात

भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने आगामी रब्बी हंगामावरही संकटाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून मतदारसंघातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.
तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोपरगाव मतदारसंघ अधिकृतपणे दुष्काळग्रस्त जाहीर करून आवश्यक त्या सर्व दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, असे आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे