आपला जिल्हा

आमदार विवेक कोल्हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, दुष्काळी परिस्थितीची केली पाहणी

आमदार विवेक कोल्हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, दुष्काळी परिस्थितीची केली पाहणी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात आ. विवेक कोल्हे यांनी केली परिस्थितीची पाहणी
पंचनामे तातडीने पूर्ण करा, नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घ्या : आ. विवेक कोल्हे
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २ ऑक्टोबर २०२६–राज्यासह कोपरगाव तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ. विवेक कोल्हे यांनी तहसीलदार महेश सावंत यांच्या समवेत तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पावसाअभावी हातातून गेलेली पिके, पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांसमोरील अडचणी तसेच आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा त्यांनी प्रशासनासोबत आढावा घेतला.पूर्व भागातील आपेगाव तिळवणी यासह विविध ठिकाणी पाहणी केली यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
कोपरगाव तालुका नुकताच दुष्काळी यादीत जाहीर झाला आहे. मात्र, दुष्काळाची तीव्रता प्रत्यक्ष शेतशिवारात किती आहे, याची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपल्याचे आणि मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले पिकांचे पंचनामे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आ. कोल्हे यांनी प्रशासनाला दिल्या.

जाहिरात
शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान पंचनाम्यात अचूकपणे नोंदवले गेले पाहिजे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका आ. विवेक कोल्हे यांनी मांडली.दुष्काळामुळे केवळ यंदाच्या पिकांचे नुकसान झालेले नाही, तर आगामी हंगामासाठी पाणी, चारा, पिण्याचे पाणी आणि शेतीच्या नियोजनाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. त्यामुळे परिस्थितीचे गावनिहाय मूल्यांकन करून आवश्यक त्या उपाययोजना आतापासूनच प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेताना आ. कोल्हे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांशी समन्वय ठेवून पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन आणि प्रशासन भक्कमपणे उभे राहील, त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू,अशी ग्वाही आ. विवेक कोल्हे यांनी दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे