शेवटचा आधार लघु चित्रफितीतून जनजागृती- रामगिरी महाराज; ड्रीम प्रॉडक्शनच्या या चित्रफितीला एक लाख व्ह्यूज
शेवटचा आधार लघु चित्रफितीतून जनजागृती- रामगिरी महाराज; ड्रीम प्रॉडक्शनच्या या चित्रफितीला एक लाख व्ह्यूज
Kopargaon vijay kapse-दि. २ ऑक्टोंबर २०२६– समाज माध्यमाची बदलती दिशा, प्रत्येकाच्या घरात नात्या मधील सुरु असलेला संघर्ष आणि जेन झी युवा पिढीची आई-वडीलांप्रती वाढलेली अनास्था याचे प्रत्यथ चित्रण ‘शेवटचा आधार’ या लघु चित्रफितीतून करण्यात आले असून त्यातून सुरु असलेली जनजागृती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन धर्माचार्य, गोदाधामचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
जाहिरात
तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथील इलेक्ट्रानिक्स उद्योजक किरण रंगनाथ डहाळे यांनी दिग्दर्शक निर्माते विनोद बनकर (नेवासा) यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांना घराघरात मुलगा, सुन, जेन झी पिढी कडून होणारा जाच, वृद्धाश्रमांत पाठविले जाणारे ज्येष्ठ यांच्या वास्तवावर शेवटचा आधार ही लघु चित्रफित तयार करण्यांत आली असून या चित्रफितीला राज्यभरातून एक लाख प्रेक्षकांनी प्रथम पसंती दर्शविली त्याचे औचित्य साधून यातील मुख्य व सहकलाकार, दिग्दर्शक आदींचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यातील काही चित्रीकरण शरणपूर वृद्धाश्रम नेवासा येथे करण्यात आले आहे.जाहिरात
प्रारंभी दिग्दर्शक विनोद बनकर यांनी लघुचित्रफित निर्मीतीचा प्रवास सांगितला याअगोदर उमगया बाप रं’ ही चित्रफित तयार करण्यांत आली, त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी जिल्हास्तरावर युवा पिढीमध्ये व्यसनाधिनता वाढत असुन त्यांना परावृत्त करण्यासाठी काय उपाययोजना असाव्या याबाबतची स्पर्धा घेतली त्यात ड्रिम प्रोडक्शनच्या कलाकारांनी जिल्हयात दुसरा क्रमांक पटकावला. नुकताच सार्वजनिक श्रीगणेश उत्सव संपन्न झाला त्यात राज्यभर उमगया बाप रं, युवा पिढी, शेवटचा आधार या लघुचित्रफितीचे माध्यमातून जनजागृती करण्यांत आली त्यास अनेकांनी पसंती दर्शविलीजाहिरात
महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, आज प्रत्येक घरात, दारात, समाजात जास्त कलह होत आहे, भ्रमणध्वनीच्या अतिरेकी वापराने मुलगा आई-वडील-सासु-सून- काका काकी-मामा- मामी आदि नात्यामध्ये छोट्या गोष्टीतून रुसवे फुगवे वाढले आहे, अध्यात्मीक परंपरा मोडीत काढल्या जात आहे, संस्कार लोप होत आहे, तेंव्हा प्रत्येकाने शेवटचा आधार ही लघु चित्रफित अवश्य पहावी., नात्यांमधील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अध्यात्माची घराघरात शिकवण व्हावी, कुलधर्म कुळाचार चालीरीती पाळल्या जाव्या, किरण डहाळे विनोद बनकर व सहकारी कलाकारांनी समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने बनवलेली चित्रफित अनेकांना प्रेरणादायी आहे, समाजातील कलह कमी व्हावे, वृद्ध पिढीच्या समस्या हलक्या व्हाव्या, आई बाप जन्मोजन्मीचे साथी आहेत त्यांचा सांभाळ व्हावा, जेन झी सुद्धा कधीतरी म्हातारे होणारच आहेत, वयोवृद्ध आई वडील आपल्या लाडक्या लेकाच्या प्रत्येक हट्टासाठी स्वतः उपाशी राहून, कर्ज काढून लाड पुरवतात, सावकाराचे कर्ज फेडतात, पण मुला मुलींचे विवाह झाल्यावर त्यांच्यात बदल होतो, आणि जन्मदात्या आई-वडिलांनाच थेट वृद्धाश्रमात धाडले जाते असे या चित्रफितीत दाखवण्यात आले आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असे घडू नये असेही ते म्हणाले.
यातील कलाकार सर्वश्री. किरण डहाळे, विनोद बनकर, मीना पाठक, निकीता आंबीलवादे, रणजितसिंग परदेशी भैय्या, प्रणव डहाळे, नितीन धुमाळ, गोविंद धुमाळ, सुरज दिघे, दिनेश सरगय्ये ज्ञानेश्वर गायके, उदावंत आर्टस, शिंदे काका, सहकलाकार योगिता अंधारे, महेश गायकवाड, साई डहाळे, गौरी अंधारे, आदिचा महंत रामगिरी महाराज यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी किरण डहाळे यांनी आभार मानले.
ग्रामीण भागातील ड्रीम प्रॉडक्शनच्या या कलाकारांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महिला सक्षमीकरणाच्या जागर स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे तर नेवासा पोलिसांच्यावतीने नशामुक्ती स्पर्धेत बक्षीसे मिळाली आहेत.