आपला जिल्हा

कोपरगावात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप व फिजिओथेरपी शिबिर

कोपरगावात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप व फिजिओथेरपी शिबिर
कोपरगावात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप व फिजिओथेरपी शिबिर
Kopargaon vijay kapse दि ४ ऑक्टोबर २०२६– : समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती कोपरगावच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सहाय्यक साधनांच्या मोजमापाचे अलिम्को शिबिर शनिवारी (दि. ३) लायन्स मूकबधिर व अपंग विद्यालय येथे उत्साहात पार पडले. शिबिरात तालुक्यातील विविध केंद्रांमधून १३० दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले.

जाहिरात
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या स्वायत्त संस्थेच्या अलिम्को, जबलपूर येथील तज्ज्ञ पथकाने  समग्र शिक्षा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक सहाय्यक साधनांसाठी मोजमाप घेतले. तज्ज्ञ डॉ. संकेत दरवणकर,  तज्ज्ञ वीरेंद्र राठोड व  तज्ज्ञ डॉ कुणाल सिंग यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. कोपरगाव तालुका गटशिक्षणाधिकारी पिंकी वाजे, विस्ताराधिकारी शबाना शेख व  संजीवनी आंबिलवादे यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे संनियंत्रण करण्यात आले. जिल्हा समन्वयक  श्रद्धा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
केंद्रस्तरीय विशेष शिक्षक सुवर्णा मगर, कांतीलाल गुरसळ, सचिन म्हस्के, अमित रणधीर, राजेंद्र पाखरे तसेच काळजीवाहक सुजाता वर्पे व नितल आहेर यांनी पालक-विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, कागदपत्रांची पूर्तता व समुपदेशनाची जबाबदारी पार पाडली. सुनील संवत्सरकर यांनी तांत्रिक सहाय्य केले. दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांचे  फॉर्मही भरून घेण्यात आले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजिओथेरपी कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी सेवा देण्यात आली. कर्णबधिर विद्यार्थ्यांचे ऑडिओग्राम काढण्यासाठी  भारती जपे व एनआरएचएमच्या डॉक्टर टीमने सहकार्य केले.

जाहिरात
लायन्स मूकबधिर व अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक  एकनाथ गोलवड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्गखोल्या, वीज व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे