न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आदिवासी युवकांना अटक करणे दुर्दैवी–मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
आदिवासी युवकांच्या न्याय मागण्या चर्चेने सोडवा

नाशिक वरून निघालेल्या विद्यार्थ्यांना परवानगी नाकारणे व काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांना अटक केल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते संगमनेर येथे बोलत होते.
यावेळी बोलताना मा शिक्षण व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की आपल्या न्याय मागण्या सरकारकडे मागणी हा प्रत्येकाचा हक्क आहे .नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील आदिवासी युवक हे त्यांच्या मागण्यांसाठी मुंबईकडे प्रवास करत आहेत. आणि जे काही मुंबईमध्ये पोहोचले आहे. त्यांना आझाद मैदानाची परवानगी नाकारली गेली आहे. त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली आहे असे समजते.

जे मुंबईकडे वाटचाल करत आहेत .ते युवक काँग्रेस कार्यालयात झोपलेले असताना त्यांना मध्यरात्री अटक करून दमदाटी केली जाते व त्यांच्यावर दहशत निर्माण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांच्या बाबत सरकारने त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे .त्यांच्या मागण्या सोडवल्या पाहिजे. तरुणांचे समाधान केले पाहिजे. मात्र युवकांना आपल्या न्याय मागण्या मागण्याची परवानगी नाकारणे हे अत्यंत वाईट आहे.
हे युवक गोरगरीब आदिवासी भागातील असून या सर्व विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजे. मात्र आदिवासी गोरगरिबांच्या मागण्या समजून घेण्याची सरकारची तयारी नाही. उलट या तरुणांवर दहशत निर्माण केली जात असून ती अत्यंत निषेधार्य असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या युवकांच्या मागण्या समजून घेऊन त्या मान्य कराव्या अशी मागणी सरकारकडे केली आहे.




