आपला जिल्हा

निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दत्तात्रय भिंगारे यांना ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’

निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दत्तात्रय भिंगारे यांना ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’

कोपरगावच्या पारंपरिक उपचार पद्धतीला राज्यस्तरीय नावलौकिक

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ६ ऑक्टोबर २०२६–कोपरगाव तालुक्यातील करंजी बु. येथील पारंपरिक वैद्य व पंचगव्य चिकित्सक  दत्तात्रय कारभारी भिंगारे (डी.के. भिंगारे) यांच्या पारंपरिक वनौषधी निर्मिती, पंचगव्य चिकित्सा, निसर्गोपचार, योग व आहारशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

जाहिरात

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए व योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या वतीने रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथील भातृमंडळ हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भिंगारे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील रुग्णांना पारंपरिक भारतीय उपचार पद्धतीच्या माध्यमातून केलेल्या सेवाकार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

जाहिरात

या कार्यक्रमास बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड, बुलडाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पूजा गायकवाड, एमजीएम विद्यापीठाच्या योगा विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद खरात, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ज्ञ उपस्थित होते.

भिंगारे यांच्या कार्याला मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे कोपरगावच्या पारंपरिक उपचार पद्धतीच्या कार्याला नावलौकिक मिळाला असून, त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे