आपला जिल्हा

नोकरी मेळाव्याचा जास्तीत युवक युवतींनी लाभ घ्यावा- शहर प्रमुख जाधव

नोकरी मेळाव्याचा जास्तीत युवक युवतींनी लाभ घ्यावा- शहर प्रमुख जाधव
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पुढाकारातून भव्य आयोजन
Kopargaon vijay kapse दि ७ ऑक्टोबर २०२६–शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण-तरुणींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रयत्न मधून ‘आनंद नोकरी मेळावा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आत्मा मालिक संकुल, कोकमठाण-शिर्डी येथे होणार तरी कोपरगाव शहरातील जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना कोपरगाव शहर अध्यक्ष अक्षय जाधव यांनी केले आहे.
या मेळाव्यात महाराष्ट्रातील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे ५० नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. शिक्षण ५ वी, १० वी, १२ वी, ITI, Diploma, BA, B.Com, B.Sc., BE, Banking, Pharma तसेच विविध क्षेत्रातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार असून, ज्यांना नोकरी मिळणार नाही अशा उमेदवारांना जॉब कार्ड वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यास कार्यक्रमास मार्गदर्शक मुकुंद सिनगर, शिवसेना युवासेना शहरप्रमुख सनी गायकवाड, जिल्हाप्रमुख सोशल मीडिया उत्तर अहिल्यानगर ज्ञानेश कपिले तसेच युवा नेते रोहित भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सह शिवसैनिकांचे सहकार्य लाभणार आहे.
मेळाव्यासाठी ७३९१९६६२९५, ९५११९१०५९५ आणि ९५११९१०३५० या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. तसेच दिलेल्या क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे