आपला जिल्हा

कोल्हेंचा जिल्हा बँकेचा बिनविरोध मार्ग मोकळा, बिपीनदादा कोल्हे की आ. विवेकभैय्या कोल्हे ?

कोल्हेंचा जिल्हा बँकेचा बिनविरोध मार्ग मोकळा, बिपीनदादा कोल्हे की आ. विवेकभैय्या कोल्हे ?

कोल्हेंचा जिल्हा बँकेचा बिनविरोध मार्ग मोकळा, बिपीनदादा कोल्हे की आ. विवेकभैय्या कोल्हे ?

Kopargaon vijay kapse दि ७ ऑक्टोबर २०२६–अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कोपरगाव सोसायटी मतदारसंघातून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि आ. विवेक कोल्हे यांचे अर्ज वैध ठरले असून इतर अर्ज अवैध ठरल्याने कोल्हे यांचा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दोन अर्ज कोल्हे कुटुंबातून असल्याने आगामी काळात कोणता अर्ज मागे घेतला जाणार आणि कोणाची वर्णी संचालक म्हणून या मतदारसंघातून लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

बिपीनदादा कोल्हे यांचा चौफेर अभ्यासाचा आवाका आणि सहकार क्षेत्रात असलेली जाण ही अतिशय व्यापक आहे तर आ.विवेक कोल्हे यांच्याकडे असणारी नाविन्यतेची जिद्द व बहुआयामी अभ्यासाची क्षमता यातून जिल्हा बँकेच्या दृष्टीने आगामी काळात कोल्हे कुटुंबातील नक्की कोण प्रतिनिधित्व करणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

जाहिरात

सबंध जिल्ह्याचे लक्ष लागलेली अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक मोठ्या नाट्यमय घडामोडी घडून पुढे जाते आहे. बिनविरोधाचे वारे वाहू लागले असताना अचानक निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची देखील चर्चा जोर धरत असताना अनेक मतदारसंघात बहुतेकांचे मार्ग मोकळे झाले असून कोल्हे कुटुंबांचे जिल्हा बँकेच्या राजकारणात असलेले महत्व पाहता कोपरगाव मधून दोनच अर्ज वैध ठरल्याने अंतिम नाव कुणाचे ठेवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे