आपला जिल्हा

संजीवनी इन्स्पायर २०२६ : कोपरगाव स्पाईकर्स विजेता

संजीवनी इन्स्पायर २०२६ : कोपरगाव स्पाईकर्स विजेता

राहुरी स्पाईकर्स उपविजेता; साई शिर्डीला तृतीय क्रमांक

Kopargaon vijay kapse दि ७ ऑक्टोबर २०२६–संजीवनी फाउंडेशन, कोपरगाव आणि संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संजीवनी इन्स्पायर २०२६’ या राज्यस्तरीय खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत कोपरगाव स्पाईकर्स संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. राहुरी स्पाईकर्स संघाने उपविजेतेपद, तर साई शिर्डी संघाने तृतीय क्रमांक मिळविला.

जाहिरात

संजीवनी सैनिकी स्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून तब्बल २६ नामांकित संघ सहभागी झाले होते. क्वालिफायर, प्री-क्वार्टर फायनल, क्वार्टर फायनल, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यापर्यंत प्रत्येक लढत चुरशीची झाली. राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेचा दर्जा उंचावला.

जाहिरात

स्मॅश, प्रभावी ब्लॉक, चपळ बचाव आणि प्रत्येक गुणासाठीची झुंज यामुळे मैदानावर रोमांचक वातावरण निर्माण झाले होते. कोपरगावच्या क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून टाळ्या व घोषणांनी खेळाडूंचा उत्साह वाढविला.

जाहिरात

स्पर्धेत विश्वा बनकर याची आदर्श खेळाडू, तर राहुरीच्या आदित्य भाग्यवान याची बेस्ट अटॅकर म्हणून निवड करण्यात आली. श्रीरामपूरचा अवघा १२ वर्षीय, १४ वर्षांखालील राष्ट्रीय खेळाडू शिवराज झिंज हा स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरला. त्याच्या उल्लेखनीय क्रीडाप्रतिभेची दखल घेत आयोजकांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

बक्षीस वितरणप्रसंगी संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातील खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे आणि कोपरगावच्या मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणे हा संजीवनीचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. ‘कोपरगाव ही व्हॉलीबॉलची पंढरी’ ही ओळख अधिक बळकट करण्यासाठी भविष्यात ही स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जाहिरात

‘संजीवनी इन्स्पायर २०२६’मुळे क्रीडाप्रेमींना दर्जेदार व्हॉलीबॉलचा थरार अनुभवता आला, तर नवोदित खेळाडूंनाही मोठ्या व्यासपीठावर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली. संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे