आपला जिल्हा

ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार बळ; रस्त्यांसाठी ४.०५ कोटींचा निधी मंजूर- आ. आशुतोष काळे

ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार बळ; रस्त्यांसाठी ४.०५ कोटींचा निधी मंजूर- आ. आशुतोष काळे

ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणार बळ; रस्त्यांसाठी ४.०५ कोटींचा निधी मंजूर- आ. आशुतोष काळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ७ ऑक्टोबर २०२६— कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग, एवढेच नाही तर शेत पानंद रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला असून उर्वरित रस्त्यांच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. याच पाठपुराव्यातून मतदारसंघातील ग्रामीण भागात मजबूत रस्ते बनवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४.०५ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास होऊन शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्या कायमच्या सुटणार आहे.

जाहिरात

ग्रामीण भागातील शेतमालाची वाहतूक सुरळीत व्हावी, विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुखकर होण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी ४.०५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यातून काकडी येथे प्रजीमा ८४ ते तालुका हद्द रस्ता करण्यासाठी ४० लाख, कुंभारी येथे इजिमा १२३ रावसाहेब बढे वस्ती ते सुभाष बढे वस्ती रस्त्यासाठी २० लाख, माहेगाव देशमुख येथे भास्कर लांडगे वस्ती ते ग्रामा १०१ पर्यंतच्या रस्त्यासाठी ५० लाख, रवंदे येथे ५ चारी ते काळधोंडी नदी रस्ता ४० लाख, वारी येथे वारी ते जिल्हा हद्द खोपडी रस्ता ५० लाख, मढी बु. येथे वॉटर सप्लाय ते पाथरे शिव रस्ता २० लाख, वाकडी येथे गोदावरी उजवा कालवा ते जाधव- पानसरे वस्ती रस्ता ४० लाख, तळेगाव मळे येथे तळेगाव ते उक्कडगाव रस्त्यासाठी ४५ लाख, तिळवणी येथे तिळवणी ते खामगाव रस्त्यासाठी ३० लाख, धरणगाव येथे प्रजिमा ५ ब्राम्हणगाव फाटा ते प्रजिमा २१६ पर्यंतच्या रस्त्यासाठी ४० लाख, सुरेगाव येथे सुरेगाव गावठाण ते वेळापूर रस्त्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

जाहिरात

या निधीतून मतदारसंघातील रस्ते मजबूत होणार असून परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर होऊन विकासाला चालना मिळणार असल्याने आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. निधी मंजूर झाल्याने काकडी, कुंभारी, माहेगाव देशमुख, रवंदे, वारी, मढी बु, वाकडी, तळेगाव मळे, तिळवणी, धरणगाव, सुरेगाव परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये  समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे