इंडिया आघाडीचे आंदोलन देशात अराजक निर्माण करण्यासाठी : ना.विखे पाटील
इंडिया आघाडीचे आंदोलन देशात अराजक निर्माण करण्यासाठी : ना.विखे पाटील
संविधानिक संस्थांवर अविश्वास; जनाधार गमावलेल्यांची अस्तित्व दाखविण्याची धडपड
Ahilyanagar vijay kapse दि ७ ऑक्टोबर २०२६-इंडिया आघाडीच्या नेत्यांना देशाची घटना आणि कायदे मान्य नाहीत. संविधानिक संस्थांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू केलेले त्यांचे आंदोलन केवळ देशात अराजक निर्माण करण्यासाठी असल्याचा आरोप जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जनाधार गमावलेल्या लोकांचे हे आंदोलन आहे. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर केवळ आपले अस्तित्व दाखविण्यासाठी सुरू असलेली ही धडपड आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी परदेशात जाऊन देशातील संविधानिक संस्थांचा वेळोवेळी अपमान केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या मागे जनतेचे कोणतेही पाठबळ नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढला आहे. मात्र, काहींना केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करायचे आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनीही या बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.





