आपला जिल्हा

विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय : ना. राधाकृष्ण विखे पाटील

विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय : ना. राधाकृष्ण विखे पाटील

विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar vijay kapse दि ७ ऑक्टोबर २०२६–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचवीस वर्षांची कारकीर्द संकल्प, संघर्ष आणि राष्ट्रसेवेला समर्पित राहिली आहे. विश्वमान्य नेतृत्व म्हणून जगभरात त्यांचा गौरव होत असून, विकसित भारताची वाटचाल साध्य करताना विरासत आणि विकासाचा योग्य समन्वय त्यांनी साधला आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वाटचालीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

जाहिरात

यावेळी जिल्ह्याचे प्रभारी लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अक्षय कर्डीले, आमदार विवेक कोल्हे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, अध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेनंतर शहरातून ‘सेवा ज्योत यात्रा’ काढण्यात आली. महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून महाविशाल गणपती मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरती करण्यात आली.

जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करून ना. विखे पाटील म्हणाले की, हा २५ वर्षांचा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या राजकीय कारकीर्दीचा नसून संकल्प, संघर्ष, संघटन, विकास आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकापासून सुरू झालेला प्रवास देशाच्या पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचला. प्रत्येक पदाच्या जबाबदारीत प्रशासन, विकास आणि जनसहभाग केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा आदर्श पंतप्रधान मोदी यांनी निर्माण केला आहे.

जाहिरात

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारताचा प्रवास देश अनुभवत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मंत्र केंद्रस्थानी ठेवून गरीब, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग, उद्योजक तसेच समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम झाले आहे.

जनधन योजनेपासून डिजिटल व्यवहारांपर्यंत, तसेच घरकुल योजनेपासून आयुष्मान भारत योजनेपर्यंत विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून अंत्योदयाचा मंत्र प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला. त्यामुळे सामान्य माणूस देशाच्या विकास प्रक्रियेशी जोडला गेला आहे.

पंचवीस वर्षांच्या कार्यकाळात भारताची डिजिटल वाटचाल अधिक वेगाने झाली. मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा आणि व्यवहार सामान्य माणसाच्या हातात आले. यूपीआय ही भारताच्या डिजिटल क्षमतेची जगभरात चर्चिली जाणारी ओळख बनली आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उत्पादन, तंत्रज्ञान व नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारत अधिक सक्षम झाला आहे. स्टार्टअप संस्कृती, संरक्षण उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताने जगात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून नव्या संधी उपलब्ध होत आहेत. युवकांच्या कौशल्याला संधी देण्यासाठी ‘स्किल इंडिया’ आणि महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारी ‘नारीशक्ती’ ही केवळ घोषणा न राहता विकासाची शक्ती बनली पाहिजे, हा विचार पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने अधिक ठळक झाला आहे. बदलता भारत आणि जगातील भारताची बदलती प्रतिमा मोदींच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी झाली असल्याचेही ना. विखे पाटील यांनी सांगितले.

स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीपर्यंत, तिहेरी तलाकविरोधी कायद्याद्वारे मुस्लिम महिलांना दिलासा देण्यापासून ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानाशी जोडलेले कलम ३७० हटविण्याच्या ऐतिहासिक निर्णयापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या वाटचालीत झाले आहेत. विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन ना. विखे पाटील यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे