आपला जिल्हा

नाना पाटेकर यांचा दमदार अभिनय आणि रोखठोक संवाद कायम स्मरणात राहतील – काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नाना पाटेकर यांचा दमदार अभिनय आणि रोखठोक संवाद कायम स्मरणात राहतील – काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नाना पाटेकर यांचा दमदार अभिनय आणि रोखठोक संवाद कायम स्मरणात राहतील – काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Sangmner vijay kapse दि ८ ऑक्टोबर २०२६ : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सशक्त अभिनयाची अमीट छाप उमटविणारे, दमदार संवादफेक आणि रोखठोक स्वभावामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या अभिनयातील ताकद, भारदस्त आवाज, परखड विचार आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली वाहिली.

जाहिरात
नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सामान्य कुटुंबातून आलेल्या नाना पाटेकर यांनी आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. ‘भालू’, ‘नटसम्राट’, ‘अंकुश’, ‘प्रहार’, ‘तिरंगा’ आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. ‘प्रहार’मधील त्यांचा कसदार अभिनय आणि ‘क्रांतिवीर’मधील त्यांचे प्रभावी संवाद अनेक पिढ्यांच्या मनावर कोरले गेले आहेत.

जाहिरात

नाना पाटेकर यांनी केवळ अभिनयाच्या माध्यमातूनच नव्हे, तर सामाजिक कार्यातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रसिद्धी आणि स्टारडमपासून दूर राहत साधी जीवनशैली जपत त्यांनी समाजातील प्रश्नांवर सातत्याने परखड भूमिका घेतली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीबरोबरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर आपल्या संवेदनशीलतेने समाजमनाला स्पर्श करणारे व्यक्तिमत्त्व होते, अशी भावना थोरात यांनी व्यक्त केली.

जाहिरात

नाना पाटेकर आणि मराठी मातीचे नाते कायम राहील – आमदार सत्यजित तांबे

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाना पाटेकर आणि मराठी मातीचे नाते कायमचे राहील. मराठी चित्रपटांमधील त्यांच्या विविधांगी भूमिका रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘क्रांतिवीर’ हा त्यांच्या कारकिर्दीतील विशेष लक्षवेधी चित्रपट ठरला. त्यांच्या प्रत्येक संवादामागे सामाजिक वास्तवाची जाणीव आणि विचारांची धार होती.

नाना पाटेकर हे चांगल्या कामाचे मनापासून कौतुक करणारे, तर चुकीच्या गोष्टींवर कोणाचीही भीड न बाळगता रोखठोकपणे बोलणारे व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर समाजाने विचार केला. त्यांच्या निधनाने देशाने एक अष्टपैलू अभिनेता, परखड विचारवंत आणि संवेदनशील सामाजिक व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशी श्रद्धांजली आमदार तांबे यांनी वाहिली.

‘क्रांतिवीर’चे संवाद आणि नाना पाटेकर हे समीकरण कायम स्मरणात राहील – युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात

डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, नाना पाटेकर आणि ‘क्रांतिवीर’मधील संवाद हे जणू एक समीकरणच बनले होते. आपल्या भारदस्त आवाजातून आणि दमदार अभिनयातून त्यांनी सर्वसामान्यांच्या मनातील भावना पडद्यावर मांडल्या. गरिबांचा, वंचितांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.

साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा आणि ‘आपल्यातीलच एक माणूस’ अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या चित्रपटांतील संवाद केवळ मनोरंजन करणारे नव्हते, तर समाजाला विचार करायला लावणारे होते. लोकशाही, सामाजिक न्याय आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी त्यांचे अनेक विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांचा भारदस्त आवाज, सशक्त अभिनय आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व रसिकांच्या मनात कायम जिवंत राहील, अशी भावना डॉ.जयश्री थोरात यांनी व्यक्त केली.

अभिनयासोबत समाजकार्यातही नाना पाटेकरांचे मोठे योगदान – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, नाना पाटेकर यांनी अभिनय क्षेत्रात मोठे योगदान दिलेच; मात्र त्यांची सामाजिक बांधिलकीही तितकीच उल्लेखनीय होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार असूनही त्यांनी अत्यंत साधे राहणीमान जपले. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून सर्वसामान्य माणसाशी असलेले नाते त्यांनी कायम जपले.

नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर संवेदनशील, दिलदार आणि समाजाच्या प्रश्नांशी नाते जोडलेले व्यक्तिमत्त्व होते. शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि गरजूंसाठी त्यांनी केलेले कार्य त्यांच्या सामाजिक जाणिवेची साक्ष देते. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे. सर्वसामान्यांच्या मनात घर करणारा हा आपला माणूस आज आपल्यातून निघून गेला, अशी भावपूर्ण श्रद्धांजली डॉ. सुधीर तांबे यांनी वाहिली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे