विद्यापीठस्तरीय ‘जल्लोष’ कला महोत्सवात एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग

विद्यापीठस्तरीय ‘जल्लोष’ कला महोत्सवात एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग
विद्यापीठस्तरीय ‘जल्लोष’ कला महोत्सवात एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग
Kopargaon vijay kapse दि ८ ऑक्टोबर २०२६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय ‘जल्लोष’ कला महोत्सव २०२६-२७ मध्ये श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आपल्या कलागुणांची प्रभावी छाप उमटविली.

दि. ३० सप्टेंबर रोजी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय, संगमनेर येथे झालेल्या या महोत्सवात महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारतीय शास्त्रीय वाद्यवादन, सुगम गायन, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, मिमिक्री, स्किट, पथनाट्य, रांगोळी, स्थळावर चित्रकला, चिकटकला व कागदकला तसेच माती काम अशा विविध कलाप्रकारांत विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडविले.
विद्यार्थ्यांच्या या सहभागाबद्दल प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळतो. ‘जल्लोष’ कला महोत्सवातील विद्यार्थ्यांचा सहभाग ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी कलेसोबतच ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रातही सातत्याने नवनवीन शिखरे गाठावीत.”

विद्यापीठस्तरीय व्यासपीठावर आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणे ही महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वाची बाब ठरली. अभ्यासासोबतच कला, सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि आत्मविश्वासाला चालना देणारा हा सहभाग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
या महोत्सवात अजय माळी, अर्जुन भुजाडे, श्रावणी निमसे, दिव्यानी जाधव, गौरी एखंडे, कल्याणी किरण कहार, पुष्पलता बेहरा, चैताली जाधव, सीमा शेख, सिफा शेख, नेहा पाईक, भक्ती गाडे, ओम मुठेकर, ईश्वरी वाकचौरे, हर्षद कानडे, यश डोंगरे, स्वरूप काळे, तनु भारती, समीक्षा कावडे, वेदांती शिंदे, तृप्ती देवकर, तेजस्विनी गारे, अर्पिता नागरे, आफरीन शेख आणि पूजा तुपसुंदर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. संतोष पवार, प्रा. राजश्री जाधव, डॉ. संगीता दवंगे तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



