आपला जिल्हा

मतदारसंघातील पायाभूत सुविधा व धार्मिक स्थळांच्या  विकासाला मिळणार चालना; ३ कोटींचा निधी मंजूर-आ. आशुतोष काळे

मतदारसंघातील पायाभूत सुविधा व धार्मिक स्थळांच्या  विकासाला मिळणार चालना; ३ कोटींचा निधी मंजूर-आ. आशुतोष काळे

मतदारसंघातील पायाभूत सुविधा व धार्मिक स्थळांच्या  विकासाला मिळणार चालना; ३ कोटींचा निधी मंजूर-आ. आशुतोष काळे

Kopargaon vijay kapse दि ९ ऑक्टोबर २०२६ – कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा परिषदेकडून जनसुविधा योजने अंतर्गत ०१.५० कोटी, नागरीसुविधा योजने अंतर्गत ०१.२५ कोटी व तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ लाख असा एकूण कोपरगाव मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.या निधीतून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याबरोबरच धार्मिक स्थळांच्या विकासालाही चालना मिळणार आहे. गावागावांतील नागरिकांच्या मागण्या आणि स्थानिक प्रश्नांची दखल घेत आ.आशुतोष काळे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.या ०३ कोटी निधीमुळे ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

मंजूर झालेल्या या ०३ कोटी रुपयांच्या निधीतून तालुक्यातील प्रमुख रस्ते, तीर्थक्षेत्रांचे सुशोभीकरण आणि स्मशानभूमींमधील आवश्यक सोयी-सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होऊन मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची गती अधिक वेगाने वाढणार आहे.  यामध्ये देर्डे चांदवड येथे श्री मारुती मंदिर देवस्थान परिसर विकसित करण्यासाठी १० लाख, सडे येथे श्री महादेव मंदिर देवस्थान परिसर विकसित करणे १० लाख, माहेगाव देशमुख येथे श्री अमृतेश्वर महादेव मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच कोळपेवाडी येथे वाल्मिक जाधव घर ते हौशीराम वाघडकर घर रस्त्यासाठी १० लाख, उभा मारुती मंदिर ते आण्णा लोणारी घर रस्ता १० लाख व सूर्यभान रखमा कोळपे दुकान ते अरविंद लाड घर रस्ता ५ लाख, रांजणगाव देशमुख येथे सय्यद गल्ली ते रामा ६५ ते मुरलीधर सहाणे दुकानापर्यंतच्या रस्तासाठी १५ लाख, हनुमान मंदिर ते पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत रस्तासाठी १५ लाख व माहेगाव देशमुख बाळासाहेब पानगव्हाणे ते अंगणवाडी ते नारायण गावित्रे इजिमा १ पर्यंतच्या रस्त्यासाठी १० लाख, सावळगाव येथे ज्ञानेश्वर जगताप घर ते दादासाहेब उकिरडे घर, पढेगाव- कासली चौफुली ते सावळगाव रोड रस्ता १० लाख, तळेगाव मळे येथे नामदेव विरकर ते विजय टुपके घर रस्ता १५ लाख व संजय उकिरडे घर ते वाल्मिक उकिरडे घर बोकटा चौफुली रस्ता १० लाख, भोजडे येथे सोमनाथ वाबळे वस्ती ते अच्युत सिनगर वस्ती रस्ता १० लाख व प्रजिमा १३ म्हसोबा मंदिर ते संचेती वस्ती रस्ता १० लाख, दहिगाव बोलका येथे दहेगाव ते गधड रस्ता १० लाख, कोकमठाण येथे गोसावी वस्ती ते कवडे वस्ती रस्ता २० लाख, सुरेगाव येथे गावांतर्गत भुसागाठी रस्ता करणे २५ लाख, घोयेगाव येथे गावांतर्गत रस्ता करण्यासाठी १० लाख, चांदेकसारे येथे आ.पी.होन सर घर ते द्वारका डेअरी रस्त्यासाठी १५ लाखांचा निधी मंजूर झाला असून अंजनापूर, चासनळी, मनेगाव यागावांसाठी १५ लाखांचा तर डाऊच बु, मुर्शितपूर व मंजूर या गावांना प्रत्येकी १० लाखांचा निधी स्मशानभूमी विकासासाठी मंजूर झाले आहे. कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी ०३ कोटी निधी मंजुर केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात

 ग्रामीण भागाचा विकास आणि ग्रामस्थांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदार संघाच्या प्रत्येक गावांतील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. केवळ आश्वासने देण्यापेक्षा विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणणे आणि ती कामे प्रत्यक्षात पूर्णत्वास नेणे, यावर माझा भर आहे. कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहणार आहे.- आ.आशुतोष काळे.

जाहिरात

                        

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे