आपला जिल्हा

संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर

संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांचा पाठपुरावा; ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे होणार अधिक भक्कम

Sangmner vijay kapse दि १० ऑक्टोबर २०२६: भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम करण्यासाठी विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लोकनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून हा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार तांबे यांनी दिली.

जाहिरात

देवकवठे ते बोटा असा सुमारे १०० किलोमीटरचा विस्तार असलेल्या संगमनेर तालुक्यात पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव भाग असे तीन भौगोलिक विभाग आहेत. तालुक्यातील १७१ गावे व २५८ वाड्या-वस्त्यांमध्ये सातत्याने विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या ३०५४ योजनेंतर्गत २ कोटी रुपये, तर इतर निधीतून १ कोटी रुपये, असा एकूण ३ कोटी रुपयांचा निधी विविध रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी मंजूर करण्यात आला आहे.

जाहिरात

एक कोटी रुपयांतून होणारी कामे

चिखली ते जवळे कडलग रस्ता (इजीमा ३३) मजबुतीकरणासाठी ४० लाख रुपये, जवळे-बाळेश्वर रस्ता व सारोळे पठार फाटा ते सारोळे पठार गाव (इजीमा ३७) रस्ता मजबुतीकरणासाठी २० लाख रुपये, शेंडेवाडी-सतीचीवाडी-डोळसणे रस्ता मजबुतीकरणासाठी २० लाख रुपये, तसेच शेडगाव-मालुंजे-रणखांब-कवठे मलकापूर-वरवंडी फाटा ते खांबे रस्ता मजबुतीकरणासाठी २० लाख रुपये, असा एकूण १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दोन कोटी रुपयांतून विविध रस्त्यांची सुधारणा

जिल्हा नियोजन समितीच्या ३०५० अंतर्गत खांबा ते खरशिंदे रस्ता मजबुतीकरणासाठी १० लाख रुपये, कवठे मलकापूर-काळे वस्ती रस्त्यासाठी १० लाख, डिग्रस ते हजारवाडी रस्त्यासाठी १० लाख, पिंपळगाव कोझिरा ते चोथेमळा रस्त्यासाठी १० लाख, जवळे कडलग-वडगाव लांडगा ते नंदनखिंड रस्ता सुधारणेसाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती वडगावपान ते पोखरी हवेली रस्ता सुधारणेसाठी १५ लाख, साकुर-जोगे पठार रस्ता मजबुतीकरणासाठी १५ लाख, कुंभारवाडी ते ठाकरवाडी रस्त्यासाठी १५ लाख, वरझडी बुद्रुक ते बोडखेवाडी रस्त्यासाठी १५ लाख, नांदुरी दुमाला ते पतीगे बाबा रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर आहेत.

खांडगाव ते गणेशवाडी-गोडसेवाडी रस्ता मजबुतीकरणासाठी २० लाख, मांडवे बुद्रुक हवालदार वस्ती ते जोगे पठार घाट रस्त्यासाठी २० लाख, तर धांदरफळ खुर्द-माणकेश्वर मळा ते गोडसेवाडी रस्ता मजबुतीकरणासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जाहिरात

या सर्व कामांमुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची गुणवत्ता आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून गावागावातील नागरिकांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विविध गावांतील नागरिक, युवक आणि महिलांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले आहे.

रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार : आमदार तांबे

संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सातत्याने विविध विकास योजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामीण विकास, शेती, सहकार, शिक्षण आणि व्यापार अशा विविध क्षेत्रांत संगमनेर तालुका प्रगतिशील आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मिळालेल्या निधीतून रस्त्यांचे मजबुतीकरण होणार असल्याने नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे. यापुढेही शिक्षणासह विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. मंजूर झालेली सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यावर भर राहील.

– आमदार सत्यजित तांबे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे