आपला जिल्हा

दिया कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० विद्यार्थ्यांना मोफत टूथपेस्टचे वाटप

दिया कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० विद्यार्थ्यांना मोफत टूथपेस्टचे वाटप

दिया कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० विद्यार्थ्यांना मोफत टूथपेस्टचे वाटप

Kopargaon vijay kapse दि ११ ऑक्टोबर २०२६ : वाढदिवसाचा आनंद केवळ वैयक्तिक उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो साजरा करण्याचा प्रेरणादायी उपक्रम कोपरगाव येथे राबविण्यात आला. कोलगेट-पामोलिव्ह इंडिया लिमिटेड आणि कोठारी सेल्स कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना  दिया अमोल कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत टूथपेस्टचे वाटप करण्यात आले.

जाहिरात

विद्यार्थ्यांमध्ये दातांची स्वच्छता व तोंडाच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्याचा हा उपक्रम समाजासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला.

जाहिरात

यावेळी  अमोल कोठारी, सामाजिक कार्यकर्ते सुशांत घोडके आणि डॉ. सिद्धी आनंद कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सिद्धी कोठारी यांनी विद्यार्थ्यांना दातांची स्वच्छता, योग्य पद्धतीने दात घासणे, तोंडाचे आरोग्य आणि दंतविकारांपासून बचाव करण्याच्या उपायांबाबत मार्गदर्शन केले. दिवसातून किमान दोन वेळा दात घासणे, गोड पदार्थांचे अतिसेवन टाळणे, जेवणानंतर तोंड स्वच्छ धुणे आणि नियमित दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लहानपणापासूनच आरोग्यदायी सवयी अंगीकारा’, असे आवाहन करत डॉ. सिद्धी कोठारी यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच कुटुंबीय व मित्रपरिवारातही दातांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, असे सांगितले.

जाहिरात

अमोल कोठारी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, कला, क्रीडा आदी क्षेत्रांत प्रगती करून समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले. अभ्यासाबरोबरच शिस्त, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाणीव या गुणांचा विकास करावा, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मोफत टूथपेस्टचे वाटप करण्यात आले. उपयुक्त वस्तूंसोबत आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक  बलभिम उल्हारे, मुख्य लिपिक  नितीन जाधव,  योगेश गवळे  देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अतुल कोताडे सर यांनी केले, तर  एस. सी. बर्डे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

या उपक्रमाचे कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  कैलास ठोळे, सचिव  दिलीप अजमेरे, सहसचिव  सचिन अजमेरे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे,  राजेश ठोळे, आनंद ठोळे व  संदीप अजमेरे यांनी कौतुक केले. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा आणि समाजात सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे