सहापैकी तीन गटांत अजिंक्यपद पटकावत सोमैया विद्यामंदिरच्या खेळाडूंनी रचला इतिहास

सहापैकी तीन गटांत अजिंक्यपद पटकावत सोमैया विद्यामंदिरच्या खेळाडूंनी रचला इतिहास
सहापैकी तीन गटांत अजिंक्यपद पटकावत सोमैया विद्यामंदिरच्या खेळाडूंनी रचला इतिहास
Kopargaon vijay kapse दि १२ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत सोमैया विद्याविहार, मुंबई संचलित सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाच्या खेळाडूंनी सहापैकी तब्बल तीन गटांत अजिंक्यपद पटकावत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली.

या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुली, १९ वर्षांखालील मुली आणि १९ वर्षांखालील मुले या तीन गटांमध्ये सोमैया विद्यामंदिरच्या संघांनी अजिंक्यपद पटकाविले. विशेष म्हणजे, या तिन्ही विजयी संघांची पुणे विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक संजय अमोलिक तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक रूपाली टेके व शुभांगी राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर सोमैया , क्रीडा अकादमीचे प्रमुख एझाझ खान, आदित्य सिंग , स्थानिक शाळा समितीचे सचिव सुहास गोडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श संजय राऊत, क्रीडा समन्वयक रोहन शिंदे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या ऐतिहासिक यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली असून, आगामी पुणे विभागीय स्पर्धेतही हे खेळाडू अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.





