जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सोमैया विद्यामंदिरच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सोमैया विद्यामंदिरच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
१४ वर्षांखालील मुलींचे अजिंक्यपद; १९ वर्षांखालील मुलांचे उपविजेतेपद

Kopargaon vijay kapse दि १२ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सोमैया विद्याविहार, मुंबई संचलित सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. विजयी संघात सायली माने, श्रद्धा साबळे, समृद्धी साबळे, आदिती जमधडे आणि रोहिणी कुलकर्णी यांचा समावेश आहे.

तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळविले. या संघात साईश शिंदे, वेदांत कौसे आणि तेजस जेऊघाले यांनी दमदार कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलींच्या संघानेही चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या संघात सिद्धी साबळे, रिद्धी साबळे आणि श्रुती मोकळ यांचा समावेश होता. या यशाच्या जोरावर १४ वर्षांखालील मुलींच्या संपूर्ण विजयी संघाची, तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटातील रिद्धी साबळे हिची पुणे विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

या उल्लेखनीय यशासाठी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक संजय अमोलिक, तसेच रूपाली टेके आणि शुभांगी राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर सोमैया सर, क्रीडा अकादमीचे प्रमुख एझाझ खान , आदित्य सिंग, स्थानिक शाळा समितीचे सचिव सुहास गोडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय राऊत, क्रीडा समन्वयक रोहन शिंदे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी पुणे विभागीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या खेळाडूंनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली असून, पुणे विभागीय स्पर्धेतही खेळाडू उत्तुंग कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



