आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात मातापालक मेळावा उत्साहात

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात मातापालक मेळावा उत्साहात

पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समन्वयातून सर्वांगीण विकासाला दिशा; विद्यार्थ्यांनी आवड व क्षमतेनुसार करिअर निवडाव

Kopargaon vijay kapse दि १४ ऑक्टोबर २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात मातापालक मेळावा प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

जाहिरात

यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य रवींद्र हिंगे, पर्यवेक्षक माधव रेवगडे, विज्ञान विभागप्रमुख अण्णासाहेब गोराणे तसेच कला विभागप्रमुख कलावती देशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधी, प्रशिक्षण व उपक्रमांबाबत पालकांना मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. अर्जुन भागवत यांनी “काळानुसार शिक्षण व्यवस्थेत सातत्याने बदल होत आहेत. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवून शिक्षण घेतले पाहिजे,” असे सांगितले.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांची मेहनत या तिन्ही घटकांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे आणि क्षमतेचे क्षेत्र ओळखून त्यामध्ये करिअर घडवावे.”
यावेळी मातापालक प्रतिनिधी सौ. कुंदा जाधव, सौ. कविता मराठे आणि सौ. चंद्राविकास गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना व अपेक्षा मांडल्या. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रभावी समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक सक्षम दिशा मिळू शकते, असा सूर त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाला.

जाहिरात

या मेळाव्यास पालक, विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक माधव रेवगडे यांनी केले. सूत्रसंचालन  सुनिता आत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन  विद्या खैरे यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे