आपला जिल्हा

सर्व्हेक्षण करून ग्राउंड ट्रूथिंग रिपोर्ट तातडीने राज्य शासनाकडे सादर करा; आ. आशुतोष काळेंच्या महसूल व कृषी विभागाल सूचना

सर्व्हेक्षण करून ग्राउंड ट्रूथिंग रिपोर्ट तातडीने राज्य शासनाकडे सादर करा; आ. आशुतोष काळेंच्या महसूल व कृषी विभागाल सूचना

सर्व्हेक्षण करून ग्राउंड ट्रूथिंग रिपोर्ट तातडीने राज्य शासनाकडे सादर करा; आ. आशुतोष काळेंच्या महसूल व कृषी विभागाल सूचना

Kopargaon vijay kapse दि १४ ऑक्टोबर २०२६ :- कोपरगाव मतदारसंघात पावसाचा मोठा खंड पडला असल्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाने दिलेली उघड आणि वाढत्या उष्णतेमुळे जमिनीचा ओलावा कमी होऊन विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी कमालीची खाली गेली असून खरीप हंगामासह रब्बी हंगाम देखील धोक्यात आला असल्याने राज्य शासनाने कोपरगाव मतदारसंघात ट्रिगर २ लागू केला आहे. तसेच राज्यातील वाढत्या दुष्काळाची केंद्रीय पथकाने पाहणी केली असून केंद्र शासनाकडून राज्य शासनाला मदत केली जाणार आहे. यातून कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी महसूल आणि कृषी विभागाने सर्व्हेक्षण करून ग्राउंड ट्रूथिंग रिपोर्ट तातडीने राज्य शासनाकडे सादर करावा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत आणि तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहे.

जाहिरात

चालूवर्षी अल निनोचा पावसावर मोठा परिणाम झाला आहे. कोपरगाव मतदारसंघात जवळपास अडीच महिन्यांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडला असल्याने खरीप पिकांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. सोयाबीन,कापूस,बाजरी,मका यांसह विविध पिकांचे नुकसान झाले असून पशु धनाच्या संगोपनाच्या चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वाढत्या दुष्काळाच्या झळा पाहता राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून कोपरगाव मतदारसंघात ट्रिगर-२ लागू केला आहे. ट्रिगर-२ लागू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणार आहे. यामध्ये बाधित भागातील शेतकऱ्यांना शेतसारा व जमीन महसुलात सूट, शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला स्थगिती आणि नवीन पीक कर्ज, साडेसात एचपी शेती पंपाच्या पुढच्या कृषी पंपांना चालू वीजबिलात शासकीय नियमांनुसार सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होणार आहे, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगा कामांच्या निकषात शिथिलता आणली जाणार आहे. कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या भरवश्यावर खरिपाच्या पिकांची लागवड आणि पेरण्या केल्या होत्या. मात्र पावसाने उघड दिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून शासनाने लागू केलेल्या ट्रिगर १ आणि ट्रिगर २ च्या सवलतीचा लाभ कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळावा यासाठी महसूल आणि कृषी विभागाने सर्व्हेक्षण करून ग्राउंड ट्रूथिंग रिपोर्ट तातडीने राज्य शासनाकडे सादर करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत आणि तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत.

जाहिरात

पंचनामे पूर्ण झालेल्या सर्व शेतकऱ्यांना महायुती शासनाच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे. आ. आशुतोष काळे यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्रीम. ना.सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, कृषी मंत्री ना. दत्तात्रयजी भरणे व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे