आ.आशुतोष काळेंमुळे ४ गावांना निळवंडेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा- बाबुराव थोरात

आ.आशुतोष काळेंमुळे ४ गावांना निळवंडेचे पाणी
मिळण्याचा मार्ग मोकळा- बाबुराव थोरात
आ.आशुतोष काळेंमुळे ४ गावांना निळवंडेचे पाणी
मिळण्याचा मार्ग मोकळा- बाबुराव थोरात
Kopargaon vijay kapse दि १४ ऑक्टोबर २०२६– कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती गावांना कायमचे आणि निळवंडेचे हक्काचे पाणी देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून रांजणगाव देशमुख यथील मंगलमूर्ती लॉन्स या ठिकाणी डीवाय- ४ चारीच्या पाईप लाईनवर व्हॉल्व्ह बसवण्याचे काम पूर्ण झाले असून धोंडेवाडी, जवळके, बहादाराबाद आणि शहापूर या गावांना निळवंडेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच रांजणगाव देशमुख व अंजनापुरच्या काही परिसराला देखील फायदा होणार असून या गावांना पुढच्या आवर्तनातून पाणी मिळणार असल्यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून गावातील नागरीकांच्या वतीने उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी जिरायती गावातील शेतकऱ्यांसमक्ष निळवंडे कालव्याचे कार्यकारी अधिकारी प्रदीप हापसे, असिफ शेख व कैलास ठाकरे यांच्या समवेत वेळोवेळी बैठका घेतल्या असून या बैठकांमध्ये रांजणगाव देशमुख येथील मंगलमूर्ती लॉन्स या ठिकाणी डीवाय- ४ चारीच्या पाईप लाईनवर व्हॉल्व्ह बसवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार रांजणगाव देशमुख येथील मंगलमूर्ती लॉन्स येथे डीवाय-४चारीवर व्हॉल्व्ह बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायती गावांना निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून निळवंडे कालव्यांचे पाणी पाझर तलाव, बंधारे व गाव तळ्यांपर्यंत पोहचविले आहे.

मा.आ.अशोकराव काळे यांनी पदरमोड करून उजनी उपसा जलसिंचन योजना चालवून पश्चिमेतील काही गावांना पाणी दिले. हीच उजनी उपसा जलसिंचन योजना आ.आशुतोष काळे यांनी आज पर्यंत चालवून धोंडेवाडी, जवळके, बहादराबाद व शहापूर येथील पाझर तलाव आणि बंधारे भरले. आता या सर्व तलावांना आणि बंधाऱ्यांना रांजणगाव देशमुख यथील मंगलमूर्ती लॉन्स या ठिकाणी डीवाय-४ चारीच्या पाईप लाईनवर व्हॉल्व्ह बसवल्याने निळवंडेचे पाणी उपलब्ध होणार आहे. याचा फायदा धोंडेवाडी, जवळके, बहादाराबाद आणि शहापूर गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना होणार असल्याचे बाबुराव थोरात यांनी म्हटले आहे. आ.आशुतोष काळे यांनी २०१९ पासून पश्चिमेतील जिरायती गावांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांचेच हे फलित आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता जिरायती भागासाठी आ.आशुतोष काळे यांनी निळवंडेचे पाणी गावागावात पोहोचवून नागरीकांची कित्येक दशकांची अडचण कायमची सोडविली असल्याचे बाबुराव थोरात यांनी सांगितले आहे. मंगलमूर्ती लॉन्स येथे डीवाय-४चारीवर व्हॉल्व्ह बसवण्याचे काम पूर्ण होताच शेतकऱ्यांनी आशुतोष काळे यांच्या नावाने घोषणा देवून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात, जिनिंग प्रेसिंगचे संचालक संतोष वर्पे, रांजणगाव देशमुखचे सरपंच गजानन मते, अंजनापूरचे सरपंच अशोक गव्हाणे, माजी सरपंच ज्ञानदेव गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, रावसाहेब खालकर आप्पासाहेब गव्हाणे आदी उपस्थित होते.



