आपला जिल्हा

हॉकीच्या मैदानात गौतमचा डंका; राज्यविजेतेपदासह पाच खेळाडूंची राष्ट्रीय भरारी

हॉकीच्या मैदानात गौतमचा डंका; राज्यविजेतेपदासह पाच खेळाडूंची राष्ट्रीय भरारी

हॉकीच्या मैदानात गौतमचा डंका; राज्यविजेतेपदासह पाच खेळाडूंची राष्ट्रीय भरारी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ नोव्हेंबर २०२६ :- बुलढाणा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव करीत राज्यविजेतेपद पटकावले. या यशाला राष्ट्रीय निवडीची जोड मिळाली असून १४ वर्षांखालील गटातील चार खेळाडूंची मध्य प्रदेश येथे, तर १७ वर्षांखालील गटातील कृष्णा सातपुते याची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याशिवाय मानव महाले याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे. राज्यविजेतेपदासह राष्ट्रीय स्तरावर पाच खेळाडूंना मिळालेली संधी ही गौतम पब्लिक स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील अलौकिक कामगिरीची साक्ष ठरली आहे.

जाहिरात

राज्यातील आठ विभागांतील संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गौतमच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ, अचूक नियोजन आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. उपांत्य फेरीत मुंबई विभागाच्या संघाला पराभूत करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या बलाढ्य संघाविरुद्ध दोन्ही संघांनी शेवटपर्यंत चुरशीचा खेळ केला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये गौतमच्या खेळाडूंनी ४-३ अशी बाजी मारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १४ वर्षांखालील गटातील अभिषेक चौधरी, ओंकार डोंगरी, शहाजी घुमरे आणि रणवीर सिंग नागलोट यांची ८ ते १२ डिसेंबर २०२६ दरम्यान मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. मानव महाले याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच १७ वर्षांखालील गटातून कृष्णा गणेश सातपुते याची २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान रांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जाहिरात

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांना दर्जेदार सुविधा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळावे, यासाठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे सातत्याने प्रयत्नशील आहेत. खेळाडूंच्या सरावापासून ते स्पर्धांमधील सहभागापर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि संस्थेच्या पाठबळातून गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांत जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. बुलढाणा येथील हॉकी स्पर्धेतील राज्यविजेतेपद आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडी हे त्याचेच फलित आहे.

या यशामागे शाळेचे शारीरिक शिक्षक तथा हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. त्यांना इसाक सय्यद, राजेंद्र आढाव आणि महेश गोंडे यांचे सहकार्य लाभले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकरावजी काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व गव्हर्निग कौन्सिल सदस्य,संस्था इन्स्पेक्टर नारायण  बारे, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, प्राचार्य नूर शेख यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

 ग्रामीण भागातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद मिळविणे आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. खेळाडूंची जिद्द, शिस्त आणि जपलेली सांघिक भावना व त्यांच्या दमदार खेळाचे प्रदर्शन पाहता हे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करतील याचा विश्वास आहे. खेळाडूंनी यापुढेही मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करून शाळेसह कोपरगाव तालुक्याचा नावलौकिक वाढवावा. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी संस्था नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील.-चैताली काळे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे